
कोल्हापूर (सलीम शेख) : अलमट्टी धरणाची उंची वाढवल्यास सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यांमध्ये महापुराचा धोका वाढणार आहे, असा इशारा राजू जाधव( मनसे जिल्हाध्यक्ष) यांनी दिला आहे. 2005 साली धरणाची उंची 519 मीटर करण्यात आली आणि त्याच वर्षी या जिल्ह्यांमध्ये मोठा पूर आला होता. 2019 आणि 2021 मध्येही या भागात महापुराने मोठे नुकसान केले, ज्यात अनेक लोकांचा जीव गेला.
धरणाची उंची आणि पुराचा संबंध
अलमट्टी धरणातील पाण्याची पातळी वाढल्यामुळे कृष्णा, वर्ण, पंचगंगा नद्यांच्या काठावरील गावांमध्ये पाणी शिरते, ज्यामुळे पूर येतो. या समस्येचे मुख्य कारण अलमट्टी धरण आहे, असे अनेक तज्ञांनी स्पष्टपणे सांगितले आहे. काही समित्यांनी आणि आंतरराष्ट्रीय संघटनांनी अलमट्टी धरण आणि महापुराच्या संबंधाचा अभ्यास करून, महापुराला अलमट्टी धरणाचे बॅकवॉटरच कारणीभूत असल्याचे पुराव्यानिशी सिद्ध केले आहे.
उपाययोजना आणि मागणी
या समस्येवर तोडगा काढण्यासाठी धरणातील पाण्याची पातळी नियंत्रित ठेवणे आवश्यक आहे. तसेच, अलमट्टी धरणाची उंची वाढवण्याचा निर्णय सरकारने पुन्हा विचारात घ्यावा, अशी मागणी मनसेचे जिल्हाध्यक्ष राजू जाधव कोल्हापूर जिल्हा कार्यालयात निवेदन देऊन व्यक्त केली आहे.