गोकुळ शिरगाव औद्योगिक वसाहतीत बहरले सोन्याचे रणसींग फुलांचे झाड!

गोकुळ शिरगाव (सलीम शेख) : गोकुळ शिरगाव औद्योगिक वसाहत, भाजी मंडई जवळच्या एका कारखान्याच्या आवारात पिवळ्या फुलांनी बहरलेले एक अनोखे झाड दिसून आले आहे. वसंत ऋतूच्या आगमनामुळे अनेक झाडे आपली पाने झडून नवीन पालवी आणि फुलांनी बहरत आहेत. यापैकीच एक हे खास झाड आहे.
या झाडाचे नाव टॅबेबुया ऑरिया (Tabebuia aurea) असून ते मूळचे दक्षिण अमेरिका, ब्राझील आणि सुरिनाम या देशांमधील आहे. भारतात हे झाड प्रामुख्याने पश्चिम घाटात आढळते. या झाडाला सामान्य भाषेत सोन्याचे किंवा चांदीचे रणशिंग असेही म्हणतात. हिंदीमध्ये याला वसंत कुंज म्हणतात. हे झाड फिवेसी (Bignoniaceae) कुळातील असून त्याची उंची साधारणतः 8 ते 10 मीटर असते, काहीवेळा 12 मीटरपर्यंतही वाढते.
या झाडाचे वैशिष्ट्य म्हणजे ते वर्षातून एकदा, ठराविक कालावधीसाठीच ফুলते. वसंत ऋतूमध्ये, विशेषतः होळीच्या आसपास या झाडाला फुले येतात आणि ती नवरात्रीपर्यंत टिकतात. पिवळ्या रंगाच्या, मोठ्या आणि आकर्षक फुलांनी हे झाड पूर्णपणे भरून जाते आणि ते अतिशय सुंदर दिसते.