गोकुळ शिरगाव येथे शुक्रवारी रात्री अकराच्या सुमारास एक मोठा अपघात टळला.

गोकुळ शिरगाव (सलीम शेख) : गोकुळ शिरगाव येथे शुक्रवारी रात्री अकराच्या सुमारास एक मोठा अपघात टळला. जयहिंद हॉटेलजवळ (जुने) एका कंटेनरचा अपघात.
मिळालेल्या माहितीनुसार, HR 47 D5175 क्रमांकाचा कंटेनर गुंडगाव येथून बेंगलोरकडे जात होता. गोकुळ शिरगाव येथील हाँटेल जयहिंद जुने समोरील तीव्र वळणावर समोरच्या चारचाकी गाडीने अचानक वेग कमी केल्याने कंटेनर चालकाचा ताबा सुटला. चालकाने गाडी बाजूला घेण्याचा प्रयत्न केला, पण त्याचवेळी कंटेनर रस्त्याच्या कडेला असलेल्या बॅरिकेडला धडकून मातीच्या ढिगाऱ्यात घुसला. या अपघातात कंटेनरच्या पुढील भागाचे मोठे नुकसान झाले आहे.
कंटेनरमध्ये सुमारे 100 दुचाकी गाड्या होत्या.सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. कंटेनर चालक फारूकद्दीन आसू ( राहणार हिरीयाणा) यांनाही कोणतीही दुखापत झाली नाही.
हायवे पेट्रोलिंग घटनास्थळी धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली. क्रेनच्या साहाय्याने कंटेनरला ढिगाऱ्यातून बाहेर काढण्याचे काम सुरू आहे. या अपघातामुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती.