Uncategorizedमहाराष्ट्र ग्रामीण
Trending

गोकुळ शिरगाव येथील पंचताराकीत एमआयडीसी हायवे दुभाजक कडेला आग, अग्निशामकदलाच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला!

एमआयडीसी हायवे दुभाजक कडेला आग

गोकुळ शिरगाव (सलीम शेख): गोकुळ शिरगाव हद्दीतील पंचतारांकित एमआयडीसीजवळ महालक्ष्मी टेकडीसमोर रस्त्याच्या कडेला आज दिनांक ५ फेब्रुवारी २०२५ रोजी आग लागली. आगीचे कारण अस्पष्ट असले तरी, कोणीतरी पेटलेली वस्तू टाकल्यामुळे आग लागल्याचा अंदाज आहे.
आग रस्त्याच्या कडेला सुरू झाली आणि मोठ्या प्रमाणात पसरू लागली. यावेळी शिवधर्म न्यूज वार्ताहर सलीम शेख यांनी अग्निशामक दलातील नवनाथ साबळे माहिती दिली.
त्यानंतर थोड्याच वेळात कागल नगरपरिषद अग्निशमन दलाची गाडी घटनास्थळी दाखल झाली आणि आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न सुरू केला. आग लहान असली तरी ती झपाट्याने पसरत होती. वेळेत आग विझवल्यामुळे मोठा अनर्थ टळला.
आग विझवण्यासाठी दोन वेळा पाण्याचा वापर करण्यात आला. काही ठिकाणी प्लास्टिकच्या बाटल्या, रबरी चप्पल जळत होत्या, त्या पूर्णपणे विझवून खात्री करण्यात आली.


यावेळी कागल फायरब्रिगेडचे ड्रायव्हर अनिल वडड, फायरवर्कर बाळासो कांबळे, विलास खोत यांनी आग विझवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button