Uncategorized
Trending

नऊ ते २६ वर्षाच्या किशोरवयीन मुलींना गर्भाशयाचा कर्करोग प्रतिबंधक मोफत लसीकरण । नामदार हसन मुश्रीफ यांची घोषणा

कोल्हापूर : ‘जिल्ह्मातील नऊ वर्षावरील आणि २६ वर्षापर्यतच्या अविवाहित किशोरवयीन मुलींना गर्भाशयाचा कर्करोग प्रतिबंधक मोफत लसीकरण करप्यासाठी प्रयल्शील असल्याची माहिती वैद्यकीय दिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली. बाजारात साधारणतः दोन हजार रुपये किंमत असलेली हुमन पेंपिलोमा व्हायरस प्रतिबंधक म्हणजेच “एच.पी.त्ही.’ ही लस सीएसआर फंडातून सामाजिक बांधिलकी म्हणून मोफत लसीकरण राबविणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

होंडा पार्क येथे राजर्षी शाहू महाराज वैद्यकीय नगरीतील आरोग्य संकुलात या मोहिमेसंदर्भात आयोजित प्राथमिक नियोजन बैठकीत मंत्री मुश्रीफ बोलत होते. या मोहिमेसाठी उपयुक्त माहिती संकलन म्हणून मंत्री मुश्रीफ यांनी वयानुसार किशोरवयीन मुलींची नावे आणि माहिती संकलित करण्याच्या सूचना अंगणवाडी व आशा स्वयंसेविका यांचे प्रशासन, प्राथमिक शिक्षण विभाग, माध्यमिक डिक्षण विभाग यांना दिल्या.
यावेळी ते म्हणाले, महिलांमध्ये गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग हि फार मोठी गंभीर समस्या आहे व यामुळे भारतामध्ये प्रत्यके आठ मिनिटाला एक महिलेचा मृत्यू होत आहे. त्यामुळे यावर इलाज म्हणून किशोरवयीन अवस्थेमध्येच ‘एचपीव्ही’ या लसीचे लसीकरण केल्यास या रोगाला प्रतिबंध घालता येतो. ‘यशोमंगल चॅरिटेबल ट्रस्टच्या डॉक्टर राधिका जोशी यांनी ‘गर्भाशयाच्या कर्करोगावर प्रभावी इलाज म्हणून जागतिक आरोग्य संघटनेची मान्यता असलेली हे हुमान पॅपिलोमा व्हायरस प्रतिबंधक लसीकर आहे . हे सुरक्षी, व सुरभी आहे आणि कोणतीही हानी होत नाही , आतापर्यंत तीन हजार महिलांना लसीकरण केले आहे” असे म्हणाल्या. यावेळी अतिरिक्त जिल्हाधिकारी संजय शिदें , वैधकीय महाविद्यालयाचे अधिष्टाता डॉक्टर सत्यावर मोरे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर सुप्रिया देशमुख, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर अनिरुद्ध पिंपळे, वैधकीय अधीक्षक डॉ शिशिर मिरगुंडे, आरोग्य अधिकारी डॉ प्रकाश पवार, शिक्षणाधिकारी सौ मीना शेंडेकर, डॉ संजय रणवीर आधी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button