महाराष्ट्र ग्रामीण
कणेरीवाडी येथे गावठी गावठी दारू तयार करणारा अड्डा उद्ध्वस्त, मुद्देमाल जप्त

गोकुळ शिरगाव ( सलीम शेख) :१४ फेब्रुवारी २०२५ रोजी सायंकाळी ७:१५ वाजता गोकुळ शिरगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीतील कणेरीवाडी येथे कंजारभाट वसाहती समोरील मोकळ्या जागेत गावठी दारू तयार केली जात होती.
पोलिसांनी छापा टाकून १८०० लिटर कच्चे रसायन, १५ लिटर तयार दारू आणि दारू तयार करण्याचे साहित्य असा एकूण ५७,६००/- रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. पोलीस येताच आरोपी पळून गेले. मात्र, हिना महेश बागडे, सनी सरवर बाटुंगे, सुरेखा राजेश घारूंगे, काजल गोविंद घारुंगे आणि प्रियांका संदीप घारुंगे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास गोकुळ शिरगाव पोलीस स्टेशनच्या म.पो.ना. २११८ रसाळ आणि म.पो.हे. काँ. १६५१ पाटील करत आहेत.