कोल्हापूरमध्ये दिव्यांग व्यक्तींसाठी सुगम्य यात्रेचे आयोजन!
कोल्हापूरमध्ये दिव्यांग व्यक्तींसाठी सुगम्य यात्रेचे आयोजन!

कोल्हापूर: आज दिनांक ७ फेब्रुवारी २०२५ रोजी कोल्हापूरमध्ये दिव्यांग व्यक्तींसाठी सुगम्य यात्रा काढण्यात आली. केंद्र सरकारच्या व मा. आयुक्त, दिव्यांग कल्याण, पुणे यांच्या विद्यमाने मा. जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली व मा. मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हास्तरीय समिती गठीत करण्यात आली होती.
या समितीमध्ये 100% अंध, 100% अस्थिव्यंग व मूकबधीर, मतीमंद प्रवर्गातील विशेष शिक्षक सहभागी झाले होते. नागपूरमधून डॉ. अश्विनी दाहत या कार्यक्रमात उपस्थित होत्या.
सदर समितीने शिवाजी विद्यापीठ, महालक्ष्मी मंदिर, प्रशासकीय इमारत, जिल्हा सत्र न्यायालय, कोल्हापूर येथे भेटी दिल्या. दिव्यांग व्यक्तींना कोणत्याही ठिकाणी सुलभ संचार करता यावा यासाठी शासकीय व निमशासकीय इमारतीमध्ये अडथळा विरहित वातावरण निर्माण व्हावे, हा शासनाचा मुख्य हेतू आहे.
या सुगम्य यात्रेचे नियोजन व सहनियंत्रण संभाजी पोवार जिल्हा समाज कल्याण अधिकारी व साधना कांबळे वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ता जिल्हा परिषद, कोल्हापूर यांनी केले.
यावेळी दिव्यांग सेना कोल्हापूर जिल्हाध्यक्ष उत्तम चौगुले, कृती समिती कोल्हापूर अध्यक्ष संजय जाधव, कृती समिती कोल्हापूर सेक्युरिटी संजय पवार व दिव्यांग बांधव उपस्थित होते.