औद्योगिक वसाहतीमधील प्रदूषणामुळे परिसरातील जनता गंभीर समस्यांच्या विळख्यात। शिवसेनेची (उबाठा) कारवाईची मागणी!

गोकुळ शिरगाव (सलीम शेख) : गोकुळ शिरगाव औद्योगिक वसाहतीतील काही कारखानदार घातक रसायनयुक्त पाणी ओढ्यांमध्ये सोडत असल्याने परिसरातील ५० हून अधिक विहिरी दूषित झाल्या आहेत. विहीर मधील पाणीचा रंग हा काळ्या ऑईल सारखा दिसतो.पाण्यातील जीवजंतू नष्ट झाले असून शेती आणि फळझाडांचे मोठे नुकसान होत आहे. शेतामध्ये कोणतेही पिक उगवत नाही तसेच पाणी येवढे दुषित झाले आहे की पाण्यात मध्ये हात जरी धुतला तर दोन दिवस हाताचा उग्र वास येतो.या गंभीर समस्येवर त्वरित कारवाई करण्याची मागणी परिसरातील शेतकरी व नागरिकांनी केली आहे.
या संदर्भात बोलताना संजय पवार (उध्दव बाळासाहेब ठाकरे गट)म्हणाले, ” अनेकवेळा गोशीमा असोसिएशन आणि प्रदूषण नियंत्रण मंडळाला निवेदने दिली आहेत, पण त्याचा काही उपयोग झाला नाही. काही कारखानदार आणि प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी यांच्या सहमतामुळे (“तेरे भी चूप और मेरे भी चूप”) यावर कोणतीच कारवाई होत नाही. यामुळे शेती आणि फळझाडे नष्ट होत आहेत. कायद्याच्या मार्गाने निवेदन देऊनही उपयोग झाला नाही, त्यामुळे भविष्यात आम्हाला कायदा हातात घ्यावा लागेल.” असे संजय पवार म्हणाले.
याव्यतिरिक्त, नेर्ली-तामगाव येथे खाजगी जागेत जळक्या तेलाचे रिकामे बॅरल्स आणि रबरी टायर जाळले जात आहेत. यामुळे मोठ्या प्रमाणात धूर आणि प्रदूषण होत असून नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे, तसेच शेतीवरही परिणाम होत आहे.
या दोन्ही गंभीर विषयांवर प्रशासनाने तातडीने कारवाई करावी, अन्यथा नागरिकांना रस्त्यावर उतरावे लागेल, असा इशारा शिवसेने(उध्दव बाळासाहेब ठाकरे )गटाचे संजय पवार (शिवसेना उपनेते), विजय देवणे (जिल्हा प्रमुख), अवधूत साळोखे (उपजिल्हाप्रमुख)आणि विनोद खोत (तालुका प्रमुख) यांनी दिला आहे. यानंतर गोकुळ शिरगावमध्ये पत्रकार परिषदेत घेवून सर्व प्रशासकीय अधिकारी व तामगाम, नेर्ली ग्रामपंचायत, ग्रामसेवक, पत्रकार यांना या शेतकऱ्यांना व नागरिकांना न्याय मिळवून द्यावा असे आवाहन करण्यात आले.