महाराष्ट्र जनहित पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी महादेव वाघमोडे, उपाध्यक्षपदी प्रशांत दळवी तर सचिवपदी राजेंद्र ढाले यांची निवड

गोकुळ शिरगाव (सलीम शेख) :महाराष्ट्र राज्य जनहित पत्रकार संघांच्या कार्यकारणीची निवड करण्यात आली अध्यक्षपदी दैनिक सकाळचे महादेव वाघमोडे यांची, तर मराठी एस न्यूज व माझा तालुका या माध्यमांचे प्रतिनिधी प्रशांत दळवी याची उपाध्यक्षपदी निवड झाली तर सचिवपदी दैनिक रोखठोक व महा व्हॉइस चे गोकुळ शिरगाव प्रतिनिधी राजेंद्र ढाले यांची निवड झाली आहे.संघटनेच्या इतर पदाधिकाऱ्यांचीही निवड करण्यात आली.
तर स्मार्ट न्यूजचे निपाणी तालुका प्रतिनिधी राहुल मेस्त्री हे संघटनेचे नवे खजिनदार असतील.या वेळी संघटनेचे ज्येष्ठ सदस्य आणि पुढारीचे गांधीनगर प्रतिनिधी विश्वास शिंदे, साप्ताहिक कारभारीचे संपादक महादेव सुतार, तसेच जी न्यूजचे संपादक डॉ. राजेंद्र सूर्यवंशी हे संघटनेच्या मार्गदर्शक मंडळात असतील.संघटनेची बैठक शासकीय विश्रामगृह, कागल येथे पार पडली. या वेळी , नंद ठाकूर, अशोक ठाकूर, गोरख कांबळे, स्नेहा मांगुरकर, राजाराम चौगुले, अर्जुन गोंधळी यांच्यासह अन्य सदस्य उपस्थित होते.