
प्रतिनिधी: महाराष्ट्राचेच नव्हे तर संपूर्ण भारताचे आराध्यदैवत असलेले छत्रपती शिवाजी महाराज यांची आज 395वी जयंती आहे. त्यानिमित्त गोकुळ शिरगाव येथे महिला सन्मान परिषद यांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त गोकुळ शिरगाव येतील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पूर्णाकृती पुतळ्याला नतमस्तक होऊन पुष्प हार घालून छत्रपती शिवाजी महाराज यांचा शिवजन्मोत्सव अतिशय उत्साहात साजरा केला गेला. पारंपारिक वेशभूषेत, शिवरायांच्या नावाच्या घोषणा देत महिलांनी या वेळी हजेरी लावली. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास नतमस्तक झाल्यानंतर एक प्रेरणा मिळते अशीच भावना व्यक्त करत आम्ही मराठी आहोत, छत्रपती शिवाजी महाराजांचा आम्हाला मनापासून आदर आणि अभिमान वाटतो, त्यामुळे आम्ही दरवर्षी न चुकता छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करतो यामुळे आम्हला प्रेरणा मिळते अशी भावना संघटनेच्या अध्यक्ष प्रियाताई शिरगावकर यांनी व्यक्त केली. यावेळी संघटनेच्या अध्यक्ष प्रियाताई शिरगावकर, सीमा कांबळे, दिपाली कांबळे, प्राजक्ता कांबळे राणी कांबळे, मनिषा कुरणे, समिना शेख, पाकिजा तहसीलदार, साक्षी ढाले, आस्था कांबळे, अमृता येद्रावी तसेच गोकुळ शिरगाव पोलीस स्टेशन च्या पोलीस कॉन्स्टेबल संजीवनी पाटील आदी उपस्थित होत्या.