अपंग पुनर्वसन संस्था दसरा चौक कोल्हापूर यांच्या वतीने महिला दिनी दिव्यांग महिलांचा सत्कार!

कोल्हापूर (सलीम शेख) : अपंग पुनर्वसन संस्था दसरा चौक कोल्हापूर यांच्या वतीने जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून कर्तृत्ववान दिव्यांग महिलांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष प्रा. रविंद्र पायमल होते. कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या ॲड. वारणा सोनवणे, शिवानी चौगुले होत्या. सुरवातीस अध्यक्ष रवींद्र पायमल यांच्या हस्ते प्रमुख पाहुणे ॲड. सोनवणे मॅडम,शिवानी चौगुले यांचा सत्कार करण्यात आला. ॲड. वारणा सोनवणे व शिवानी चौगुले यांच्या शुभहस्ते डॉ. छाया देसाई, शैला गरड, अंजना लगस, अर्चना मोरे, राणी स्वामी, वनिता अपराध, वंदना पवार, प्रियांका शिंदे, कांचन नाळकर यांचा सत्कार करणेत आला. यावेळी वारणा सोनवणे मार्गदर्शन करताना म्हणाल्या की स्त्रीचे कर्तुत्व, घर, कुटुंब, समाज देशासाठी असणारे योगदान, तसेच स्त्रियांनी अपंगत्वात मात करून जीवनात यशस्वी झाले पाहिजे, तसेच स्वाभिमानाने जगायला शिकले पाहिजे. यावेळी संस्थेचे सेक्रेटरी बापू चौगुले, वसंत कांबळे, प्रल्हाद मोरे, परकाळे,विलास मोरस्कर, दत्तात्रय म्हामुलकर, सुधाकर पाटील, विनोद कोरवी, उमा पवार,शोभा सावंत,अनिता काकडे प्रियांका कुऱ्हाडे, राजू परिते, आदिसह दिव्यांग महिला, दिव्यांग बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अपंग पुनर्वसन संस्था दसरा चौक कोल्हापूर यांच्या वतीने जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून कर्तृत्ववान दिव्यांग महिलांचा ॲड. वारणा सोनवणे यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी संस्थेचे अध्यक्ष प्रा. रविंद्र पायमल, आदिसह मान्यवर उपस्थित होते.