जावयाच्या तलवार हल्ल्यात सासू गंभीर जखमी: गुन्हा नोंद

गोकुळ शिरगाव (सलीम शेख) : गोकुळ शिरगाव येथे एका धक्कादायक घटनेत जावयाने सासूवर तलवार हल्ला करून तिला गंभीर जखमी केले आहे. ही घटना मंगळवारी के. आय. टी. कॉलेजजवळ घडली. मालन शामराव पाटील (सासू) असे जखमी महिलेचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी निलेश कृष्णा तोरस्कर (जावई, रा. यळगूड, ता. हातकणंगले) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
घटनेचा तपशील पुढीलप्रमाणे
निलेश तोरस्कर याचा १६ वर्षांपूर्वी राधिका पाटील यांच्याशी विवाह झाला होता. त्यांना तीन मुली आहेत.
लग्नानंतर निलेश राधिकाला वारंवार त्रास देत असल्याने ती माहेरी येत असे.
सासरच्या लोकांनी तिची समजूत काढून तिला पुन्हा सासरी पाठवले, पण निलेशच्या वागण्यात बदल झाला नाही.
राधिकाच्या मुलीची दहावीची परीक्षा झाल्यानंतर तिला सासरी पाठवण्याचे तिच्या माहेरच्यांनी ठरवले होते.
यामुळे संतप्त झालेल्या निलेशने सासरच्यांना धमक्या दिल्या.
मंगळवारी तो सासरवाडीच्या दारात आला आणि सासू मालन पाटील यांच्यावर तलवार हल्ला करून त्यांना गंभीर जखमी केले.
पोलिसांकडून तपास सुरू:
या घटनेची नोंद गोकुळ शिरगाव पोलिस ठाण्यात झाली असून सहा. पोलिस निरीक्षक टी. जे. मगदूम या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.