कागलमध्ये गांजा जप्त, तिघांना अटक!

कागल (सलीम शेख) : कागल पोलिसांनी एका घरावर छापा टाकून ११८६ ग्रॅम गांजा जप्त केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी सिद्धेश खुशालचंद चव्हाण (वय २९), राजेश खुशालचंद चव्हाण (वय ३३) आणि वंदना खुशालचंद चव्हाण (वय ४८, सर्व राहणार बिरदेव वसाहत, रेल्वे लाईन, कागल) हे आपल्या राहत्या घरी गांजा विक्री करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी त्यांच्या घरावर छापा टाकला.
छाप्यात पोलिसांनी ३३ प्लास्टिकच्या पिशव्यांमध्ये हिरवट व तपकिरी रंगाचा गांजा आणि एका मोठ्या प्लास्टिकच्या पिशवीत सुकलेली पाने, फुले व बिया असलेला गांजा असा एकूण ११८६ ग्रॅम गांजा जप्त केला. जप्त केलेल्या गांजाची किंमत ४७,४४० रुपये आहे.
या प्रकरणी कागल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस उपनिरीक्षक वैभव जमादार आणि पोलीस हेडकॉन्स्टेबल आर. एस. कांबळे अधिक तपास करत आहेत.