गोकुळ शिरगाव औद्योगिक वसाहतीत समोरील सेवामार्ग जवळील अतिक्रमण मोहीम, हायवे पेट्रोलिंगची कडक कारवाई!

गोकुळ शिरगाव( सलीम शेख) : गोकुळ शिरगाव औद्योगिक वसाहतीत काही दिवसांपूर्वी अतिक्रमण मोहीम राबवण्यात आली होती. या मोहिमेत हटवण्यात आलेल्या खाद्यपदार्थांच्या गाड्या औद्योगिक वसाहतीमधील ब्रिजजवळील राष्ट्रीय महामार्गावरील सेवा मार्गाच्या बाजूला तसेच रस्त्याच्या कडेला असणाऱ्या सर्विस रोड शेजारी लावण्यात आल्या होत्या. काही दिवसांपूर्वी या ठिकाणी रस्त्याच्या कडेला असणाऱ्या सर्विस रोड शेजारी खाच मारली गेली होती, ती खाच मुजवून लोकांनी खाद्यपदार्थांच्या गाड्या मोठ्या प्रमाणात लावल्या होत्या.
यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत होता.
या प्रकाराची माहिती मिळताच हायवे पेट्रोलिंगचे भालेकर यांनी तात्काळ कारवाई करत सर्व गाड्या हटवल्या. तसेच, परत खाच मारण्याचे आदेश दिले आहेत. या कारवाईमुळे सेवा मार्गावरील वाहतूक सुरळीत झाली आहे.
गोकुळ शिरगाव औद्योगिक वसाहतीत काही दिवसांपूर्वी अतिक्रमण मोहीम राबवण्यात आली होती. या मोहिमेत खाद्यपदार्थांच्या गाड्या हटवण्यात आल्या होत्या. हटवलेल्या गाड्या सेवा मार्गाच्या बाजूला तसेच सर्विस रोड शेजारी लावण्यात आल्या होत्या. हायवे पेट्रोलिंगचे भालेकर यांनी तात्काळ कारवाई करत सर्व गाड्या हटवल्या.परत खाच मारण्याचे आदेश दिले. या कारवाईमुळे सेवा मार्गावरील वाहतूक सुरळीत झाली आहे.
हायवे पेट्रोलिंगच्या या कारवाईचे स्थानिकांनी स्वागत केले आहे. या कारवाईमुळे सेवा मार्गावरील वाहतूक सुरळीत झाली असून, नागरिकांना दिलासा मिळाला आहे.