Uncategorized

गोकुळ शिरगाव एमआयडीसीतील दोन कंपन्यांमधील चोरी उघडकीस; १ लाख १४ हजारांचा मुद्देमाल जप्त!

गोकुळ शिरगाव (सलीम शेख) : गोकुळ शिरगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गोकुळ शिरगाव एमआयडीसी येथे दोन कंपन्यांमध्ये झालेल्या चोरीच्या घटना उघडकीस आणून पोलिसांनी १ लाख १४ हजार १०० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.फिर्याद

सिद्धेश विकास सूर्यवंशी (रा. बेलबाग मंगळवार पेठ कोल्हापूर) व योगेश शिवाजी चौगुले (रा. साके कागल) यांनी दिली आहे.या प्रकरणी चार आरोपींना अटक करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार २८ फेब्रुवारी २०२५ रोजी दुपारी १:०० ते १ मार्च २०२५ रोजी सकाळी ९:०० या वेळेत श्री समर्थ इंजिनिअरिंगमधून ५७,६०० रुपये किमतीचे २४० किलो वजनाचे ॲल्युमिनिअमचे इनगॉट चोरीला गेले.
१ मार्च २०२५ रोजी सकाळी १०:०० ते २ मार्च २०२५ रोजी सकाळी ८:०० या वेळेत जे २७ गोकुळ शिरगाव एमआयडीसी येथील समर्थ इंजिनिअरिंगमधून ५६,५०० रुपये किमतीचे ११३ नग बेअरिंग हाउसिंगचे तयार जॉब (१५३ किलो) चोरीला गेले.
पोलिसांनी मिळालेल्या माहितीच्या आधारे तपास पथक तयार केले.
तपास पथकाने आरोपींना चौकशीसाठी ताब्यात घेतले.
आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली.
अटक केलेले आरोपी हातिम इस्माईल मुल्लानी (वय २९, रा. कणेरी),अजित अशोक कांबळे (वय २६, रा. माधवनगर कणेरी), शिवचरण रमेश खंडेल (वय २७, रा. माधवनगर कणेरी), सलमान मुरादअली मुल्ला (वय ३४, रा. माधवनगर कणेरीवाडी)
पोलिसांची भूमिका पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित, अपर पोलिस अधीक्षक जयश्री देसाई, उपविभागीय पोलिस अधिकारी सुजितकुमार क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली हा तपास पार पडला.गोकुळ शिरगाव सपोनि टी. जे. मगदूम, सफी शेख, पो. हे. कॉ. इदे, पो. हे. कॉ. कांबळे, पो. हे. कॉ. संदेश कांबळे, गोपनीय अधिकारी भरत कोरवी, पो. कॉ. संदेश पोवार, पो. कॉ. किरण मोरे, पो. कॉ. चव्हाण, पो. कॉ. कुंभार यांनी या तपासात सहभाग घेतला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button