गोकुळ शिरगाव औद्योगिक वसाहतीतील प्रदूषणामुळे शिवसेना उबाटा शिष्ट मंडळाची गोशीमा कार्यालयात बैठक!

गोकुळ शिरगाव (सलीम शेख) : येथील औद्योगिक वसाहती मधील गोकुळ शिरगाव मॅन्युफॅक्चर असोसिएशनच्या कार्यालयामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून आक्रमकपणे बैठक घेण्यात आली. या बैठकीमध्ये गोकुळ शिरगाव एमआयडीसी मधील झालेले प्रदूषण याबद्दल ही बैठक वाद विवादात पार पडली.
या बैठकीमध्ये शिवसेनेचे उपनेते आणि जिल्हाप्रमुख संजय पवार म्हणाले, आम्ही अनेक वेळा निवेदन देऊन सुद्धा कारवाई करण्यात आलेली नाही. प्रदूषण विभाग व उद्योग भवन अशा लोकांवर कारवाई का ? करत नाही. गोकुळ शिरगाव मॅन्युफॅक्चर असोसिएशन गोशिमा अशा लोकावर कार्यवाही प्रशासन मदत का ?करत नाही. असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
पुढे बोलताना पवार म्हणाले जे प्रदूषण करतात त्यांचे कारखान्यात त्वरित बंद करा या कारखान्यांमध्ये 50 विहिरी खराब होऊन 500 लोकांच्या कुटुंबावर या प्रदूषणाचा परिणाम होऊन उपासमारीची वेळ आली आहे. या गोष्टीची दखल न घेतल्यास शिवसेना शिष्ट मंडळाची संबंधित कार्यालयांवर धडक मोर्चा व उपोषण करण्यात येईल.
गोशिमा येथे झालेल्या बैठकीमध्ये शिवसेना गटाचे उपनेते आणि जिल्हाप्रमुख संजय पवार, शिवसेनेचे शिष्ट मंडळ, तसेच गोकुळ शिरगाव मॅन्युफॅक्चर असोसिएशनचे अध्यक्ष स्वरूप कदम,विविध पदाधिकारी उपस्थित होते तसेच काही कारखानदार, शिवसेनेचे संजय पवार (शिवसेना उपनेते),विजय देवणे(शिवसेना जिल्हाध्यक्ष), अवधूत साळोखे,विनोद खोत, शंकर खोत, शांताराम पाटील, दत्ता पाटील, संतोष जाधव, सुरेश पाटील,राजू यादव, शोनक भिडे, महादेव कुकडे
अशरफ पकाली, सातापा गाडेकर ,भारत खोत ,तानाजी म्हाकवे ,दिलीप पाटील व मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते.