HSRP नंबरप्लेट कोणत्या गाड्यांना लावण्याची गरज नाही ? तुमची गाडीला आवश्यकता आहे का? नियम आणि प्रक्रिया जाणून घ्या!

HSRP नंबरप्लेटचा नियम लागु झाल्यानंतर सर्वसामान्यांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण होत आहेत . जसे की HSRP म्हणजे नक्की काय आहे ? ते कोणत्या गाड्यांना लावण्याची गरज आहे किंवा नाही? ते का गरजेचं आहे? ते कसं करायचं? त्यासाठी खर्च किती आयते ? त्याची प्रक्रिया काय आहे? आज याबद्दल तुम्हाला माहिती सांगणार आहोत.
महाराष्ट्र परिवहन विभागा मार्फत एक मानक कार्यप्रणाली (SOP) जारी करण्यात अली आहे व या अंतर्गत सगळ्या बाईक आणि कारला HSRP नंबरप्लेट सक्तिचं करण्यात आलं आहे. यासाठी सर्व वाहन मालकांना मार्च 2025 पर्यंत मुदत देण्यात आली होती जी आता एप्रिल 2025 पर्यंत वाढवण्यात येत आहे. जर तोपर्यंत ही HSRP लावली गेली नाही तर नियमांनुसार दंड आकारला जाईल पण हा नियम लागु झाल्यानंतर सर्वसामान्यांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले. जसे की HSRP म्हणजे नक्की काय? ते कोणत्या गाड्यांना लावण्याची गरज आहे किंवा नाही? ते का गरजेचं आहे? ते कसं करायचं? त्यासाठी खर्च किती? आज याबद्दल तुम्हाला माहिती सांगणार आहोत HSRP चा फूल फॉर्म High Security Registration Plate असा होतो (हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट). ही एक विशेष प्रकारची नंबर प्लेट आहे, जी चोरी, गैरवापर आणि बनावट नंबर प्लेट्स रोखण्यासाठी सरकारने अनिवार्य केली आहे. या प्लेटमध्ये एक खास क्रोमियम-आधारित होलोग्राम, लेसर-कोड आणि स्थायिक क्रमांक असतो, जो डुप्लिकेट नंबर प्लेट तयार होण्यापासून वाचवतो.सरकारच्या नियमानुसार, ज्या गाड्या 1 एप्रिल 2019 पूर्वी नोंदणीकृत झाल्या आहेत, त्या दोन चाकी (बाईक, स्कूटर), चार चाकी (कार, एसयूव्ही, जीप), कमर्शियल वाहन (ट्रक, बस, ऑटो रिक्षा) वाहनांना HSRP नंबर प्लेट लावणे अनिवार्य आहे.