कागलमध्ये युवा सेनेच्या शाखेचे उद्घाटन; ॲड. वीरेंद्रसिंह मंडलिक यांच्या हस्ते शुभारंभ!

कागल (सलीम शेख) : कागल एसटी स्टँड परिसरात युवा विजय महाराष्ट्र दौऱ्याअंतर्गत कोल्हापूर जिल्ह्यातील कागल विधानसभा येथे युवा सेनेच्या कागल शहर शाखेचा उद्घाटन सोहळा ॲड. वीरेंद्रसिंह मंडलिक यांच्या हस्ते उत्साहात पार पडला.
यावेळी बोलताना ॲड. वीरेंद्रसिंह मंडलिक म्हणाले, “कोल्हापूर जिल्ह्यातील प्रत्येक गावात शाखा स्थापन करण्याची मोहीम सर्व कार्यकर्त्यांनी हाती घ्यावी. तसेच संघटना वाढवून लोकांच्या समस्यांसाठी सर्व कार्यकर्ते संपर्कात राहावे.”
या सोहळ्याला युवा सेना राज्य कार्यकारणी सदस्य शिवाजी जाधव, कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष संदीप ढेरे, कागल शहर शाखाप्रमुख तुषार कोकाटे, उपशाखाप्रमुख अमर जकाते, श्रीधर जकाते, प्रशांत सिद्धेश्वर, संग्राम डवरी, आदित्य वदूरे, अनिकेत माने, अथर्व तिराळे, मयूर भारमल आणि परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.कागल शहर शाखेच्या उद्घाटनानंतर युवा सेनेच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत जल्लोष केला. यावेळी कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह दिसून आला.