कणेरीमठ परिसरात मानवी कवटी सापडल्याने खळबळ!

गोकुळ शिरगाव (सलीम शेख) : करवीर तालुक्यातील कणेरी येथील प्रसिद्ध सिद्धगिरी मठाच्या परिसरात मानवी कवटी सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. या घटनेची नोंद गोकुळ शिरगाव पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.बुधवार, १९ मार्च रोजी सकाळी १० वाजता ही घटना उघडकीस आली. सागर बाळासो आडनाईक (वय ४०, रा. वरचा माळ, कणेरी) यांनी पोलिसांना या घटनेची माहिती दिली. हत्ती गवताच्या शेतात अज्ञात व्यक्तीची मानवी कवटी आढळून आली.कवटी सापडल्याची बातमी गावात पसरताच नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली.गोकुळ शिरगाव पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन कवटी ताब्यात घेतली. कवटी वैद्यकीय तपासणीसाठी पुण्याला पाठवण्यात आली आहे.
कवटी नेमकी कोणाची आहे आणि ती तिथे कशी आली, याचा तपास पोलीस करत आहेत.
या घटनेमुळे कणेरी परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.कणेरी मठासारख्या पवित्र ठिकाणी मानवी कवटी सापडल्याने स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटनेचा लवकरात लवकर तपास करून सत्य बाहेर यावे, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.गोकुळ शिरगाव पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक भादोले पुढील तपास करीत आहेत. मानवी कवटी सापडल्याने कणेरीमठ परिसरात चांगलीच खळबळ उडाली आहे.