कोल्हापुरात शिव आरोग्य सेनेतर्फे मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन; ४०० हून अधिक नागरिकांनी घेतला लाभ!

कोल्हापूर (सलीम शेख): शिव आरोग्य सेनेच्या वतीने डॉ. संतोष पाटील यांच्या पूजा क्लिनिक आणि जानकी हॉस्पिटलच्या सहकार्याने कनेरकर नगर येथे भव्य मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात ई.सी.जी., रक्तातील साखर आणि रक्तदाब तपासणी मोफत करण्यात आली. या शिबिराचा ४०० हून अधिक नागरिकांनी लाभ घेतला.
कोल्हापुरातील आरोग्य क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या आणि गरजूंना नेहमी मदत करणाऱ्या डॉ. शिरीष मिरगुंडे, डॉ. गीता पिल्लाई, डॉ. सारंग खोचीकर, डॉ. प्रशांत चौधरी, डॉ. जयंत भोसले, डॉ. विकास कागले, डॉ. अजित सर, तसेच कोरोना काळात विशेष कामगिरी केलेले हर्षल सुर्वे, आरोग्य मित्र बंटी सावंत आणि सुधीर बुवा या ११ जणांचा या कार्यक्रमात सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संजय पवार होते. शिव आरोग्य सेनेचे डॉ. किशोरजी ठाणेकर, विजय देवणे, रविकिरण इंगवले, सुनील मोदी, हर्षल सुर्वे, विशाल देवकुळे, अवधूत साळोखे, प्रतिज्ञा उत्तुंरे, रीमा देशपांडे, डॉ. शिल्पा पाटील, डॉ. शुभम पाटील, डॉ. शुभश्री पाटील, धनाजी दळवी, दिनेश परमार, मंजित माने, हर्षल पाटील, राजू जाधव, सुहास डोंगरे, विवेक काटकर, समरजित जगदाळे, विशाल चव्हाण, विकी मोहिते, गोविंद वाघमारे आणि अमित पै यांच्यासह अनेक मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित होते.