लोकराज्य को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीचे आमदार डॉ. अशोकराव माने (बापू) यांच्या हस्ते उद्घाटन!
काटकसरीने कारभार करून लोकराज्य क्रेडिट सोसायटी सभासद हित जोपासेल : डॉ.अशोकराव माने.

कोल्हापूर (सुभाष भोसले ) : लोकराज्य को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी या संस्थेच्या साने गुरुजी वसाहत येथील मुख्य कार्यालयाचे उद्घाटन हातकणंगले विधानसभेचे आमदार डॉ. अशोकराव माने (बापू) यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी शिक्षक नेते दादासाहेब लाड ,निवृत्त कार्यकारी अभियंता डी वाय कदम ,कोल्हापूर महानगरपालिका काँग्रेस गटनेते शारंगधर देशमुख, माजी नगरसेवक सुभाष रामुगडे, श्रीनाथ सहकार समूह कागलचे संस्थापक चंद्रकांत गवळी, भाजपा जिल्हा ओबीसी आघाडी जिल्हाध्यक्ष डॉ. आनंद गुरव, करवीर निवासिनी साप्ताहिकचे संपादक सुनील कुंभार, कोल्हापूर जिल्हा मुख्याध्यापक संघाचे व्हा .चेअरमन रवींद्र मोरे, कोजिमाशि पतसंस्थेचे माजी चेअरमन मदन निकम, कोजिमाशि पतसंस्था निवृत्त सीईओ अरविंद पाटील, जनार्दन गुरव, परिवर्तन संघटनेचे संस्थापक अमोल कुरणे, गव्हर्नमेंट सर्व्हट बँक संचालक संजय खोत , प्रशांत भोसले,प्रमोद जाधव , राजू साठे , वसंतराव पाटील, डॉ. रणजीत पोवार व विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. उपस्थितांचे स्वागत व प्रास्ताविक लोकराज्य को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष अनिल चव्हाण यांनी केले. यावेळी बोलताना ते म्हणाले, या क्रेडिट सोसायटीचा कारभार काटकसरीने व पारदर्शक करून सभासद हित जोपासण्याकडे प्राधान्य दिले जाईल. याद्वारे होतकरू गरजू लोकांच्या आर्थिक गरजा भागविल्या जातील, असे प्रतिपादन केले. आमदार अशोकराव माने यांनी लोकराज्य क्रेडिट सोसायटीच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. गरजू गरीब लोकांच्या आर्थिक गरजा या संस्थेद्वारे भागविल्या जाव्यात. त्याचबरोबर ठेवीदारांच्या विश्वासाला पात्र राहून काटकसरीचा कारभार या संस्थेद्वारे केला जावा अशी अपेक्षा त्यांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केली . यावेळी शिक्षक नेते दादासाहेब लाड यांनीही लोकराज्य क्रेडिट सोसायटीच्या कार्यास शुभेच्छा दिल्या. आभार रवींद्र मोरे यांनी मानले. कार्यक्रमास लोकराज्य को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीचे उपाध्यक्ष अभिजीत पाटील, संचालक संतोष अभंगे, सुनील चव्हाण, अशोक चव्हाण ,बाळकृष्ण गवळी ,शशिकांत जाधव, जयश्री चव्हाण, कुसुम राजमाने ,डॉ.ऋतुजा चव्हाण ,डॉ.अंजली चव्हाण आदी संचालक व मान्यवर उपस्थित होते.