मनसे वाहतूक सेनेचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना निवेदन! सीमा शुल्क तपासणी नाके बंद करण्याच्या निर्णयाला विरोध !

कोल्हापूर (सलीम शेख) : महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कोल्हापूर दौऱ्यादरम्यान ताराबाई पार्क सर्किट हाऊस येथे महाराष्ट्र राज्यातील सीमा शुल्क तपासणी नाके (चेक पोस्ट) बंद करण्याच्या निर्णयाला विरोध दर्शवला. यासंदर्भात अजित पवार यांना निवेदन देण्यात आले.
निवेदनातील महत्वाचे मुद्दे राज्य सरकारने सीमा शुल्क तपासणी नाके बंद करण्याचा निर्णय मागे घ्यावा.या निर्णयामुळे राज्यात अवैध धंदे आणि तस्करी वाढण्याची शक्यता आहे. राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेवर विपरीत परिणाम होईल.मनसेचे म्हणणे आहे की, सीमा शुल्क तपासणी नाके बंद केल्यास राज्यात गुन्हेगारी वाढेल आणि राज्य सरकारचे नियंत्रण कमी होईल. त्यामुळे हा निर्णय तातडीने मागे घेण्यात यावा. यावेळी निवेदन देताना राजू जाधव, राहुल कुंभार, नयन गायकवाड,तुषार चिक्कोडीकर उपस्थित होते.