गोकुळ शिरगाव येथे महिलांच्या वरील होण्याऱ्या अन्याय-अत्याच्याराचे प्रतिकारात्म दहण!

प्रतिनिधी: भारतील महिलांवर होण्याऱ्या अन्याय अत्याचाराचे वाढते प्रमाण लक्षात घेता महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न चव्हाट्यावर येवुन बसलेला आहे. ५ वर्षाच्या बालीका पासुन ते ७० वर्षाच्या म्हातारी पर्यंत कोणत्याच वयोगटातील महिला सुरक्षीत नसुन त्यांच्यावर होणाऱ्या अत्याचारांचे प्रमाणे दिवसेंदिवस वाढतच चालेले आहे. त्यामुळे सरकारने महिलांच्या सुरक्षीततेसाठी नुसते कायदे कडक करून चालणार नाही तर प्रत्यक्षात काहितरी कृती कार्यक्रम करणे खुप गरजेचे आहे. अन्याय होवुच नये यासाठी कृती कार्यक्रम आखुन त्याबद्दल महिलांमध्ये जनजागृती करावी अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.
तसेच देशात सद्या वादग्रस्त कृत्य व वक्तव्य करून जाती धर्मावरून दंगल सदृष्य वातवरण निर्माण करणाऱ्या देश विघात व्यक्तिंवर वेळीच मज्जाव करून त्यांना चपराक बसावी असा धडा त्यांना कायद्याने शिकवावा जेणे करून समाजात कायदा व सुवस्था अबादित राहिल. तसेच आजची हि होळी महिलांच्या वरील होण्याऱ्या अन्याय अत्याच्याराचा राक्षस व देश-विघातक विरोधातील व प्रवृत्ती चे प्रतिकारात्म दहण आहे असे मत प्रियाताई शिरगावकर यांनी व्यक्त केले सदरची होळी गोकुळ शिरगाव फाट्यावर करण्यात अली यावेळी बहुसंख्य लोक या प्रतीकात्मक होळी कडे उत्सुकतेने पाहत या समाधान व्यक्ती करत होते व महिलांना प्रोत्साहन देत होते, यावेळी पूजा शिदे, अश्विनी सुशांत देसाई, सीमा काबळे, समिना शेख, अश्विनी शिंदे, प्राजक्ता कांबळे, नेत्रा कांबळे आदी महिला उपस्तीथी होत्या .