कागल नगरीमध्ये निरंकारी सत्संग सोहळा अत्यंत उत्साहात साजरा!

कागल (सलीम शेख): निरंकारी सद्गुरु माता सुदीक्षा महाराज यांच्या पावन कृपा आशिर्वादाने ९ मार्च २०२५ रोजी कागल मधील दुधगंगा विद्यालयासमोरील भव्य पटांगणामध्ये आध्यात्मिक प्रवचनाचा कार्यक्रम अत्यंत उत्साहात पार पडला.
युवा कीर्तनकार तेजस घोरपडेनी मुख्य प्रवचनामध्ये चौऱ्यांशी लक्ष प्रकारचे फेरे मारून मिळालेल्या मनुष्य जन्माचे कल्याण केवळ समयाच्या सदगुरूकडून प्राप्त होणाऱ्या ब्रह्मज्ञानाने शक्य आहे.आजच्या समयाला हे ब्रह्मज्ञान सद्गुरू माता सुदीक्षा महाराज देत आहेत आणि मानवमात्राचे कल्याण करत आहेत असे प्रतिपादीत केले.
सत्संग साठी हजारोच्या संख्येने भाविक उपस्थित होते. मुंबई -पुणे इकडून सुद्धा भक्त पोहोचले होते. उत्कृष्ट स्टेज संचलन पुण्याचे नोटरी वकील संतोष मोरे ह्यांनी केले. सद्गुरू माताजीच्या आशिर्वादाने जिज्ञासू भाविकांना ब्रह्मज्ञान देण्याची सेवा दत्तात्रय गोरेनी केली. झोनल इंचार्ज महात्मा अमरलाल ह्यांचे विशेष सहकार्य लाभले. क्षेत्रीय संचालक शहाजी पाटील ह्यांनी सेवादल च्या माध्यमातून कार्यक्रमाच्या सेवेचे अतिशय सुंदर नियोजन केले. सर्वांच्या वतीने स्टेज सत्कार मुखी शिवाजी डोंगळे ह्यांनी केला.
कार्यक्रमाचे नियोजन कागल साधसंगत कडून करण्यात आले होते. कागल मधील नारी सत्संग आणि बाल सत्संग ने कौतुक करावे असे कार्य केले शिवास निरंकारी साप्ताहिक सत्संग प्रत्येक रविवारी साय ७-९ ह्या वेळेमध्ये राममंदिरला लागून असणाऱ्या शाहूनगर वाचनालयाच्या हॉल मध्ये होत असते भाविक भक्तांनी अवश्य लाभ घ्यावा अशी माहिती जितेंद्र पटेल कागल ह्यांनी दिली.