नामदार रामदासजी आठवले साहेब यांच्या उपस्थितीत शाम लाखे यांचा पक्षप्रवेश कोल्हापूर जिल्ह्यात रिपब्लिकन पक्ष भक्कम : सतीश माळगे

कोल्हापूर (सलीम शेख) : मुंबई येथे रिपब्लिकन पक्ष कार्यालयात पक्ष प्रवेश कार्यक्रम झाला.डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या संकल्पनेतील असलेला रिपब्लिकन पक्ष हा सर्व जाती धर्मीयांना घेऊन काम करणारा आहे. या पक्षाचे नेतृत्व संपूर्ण देशभरात रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा,केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री नामदार रामदासजी आठवले हे रिपब्लिकन पक्षांमध्ये ब्राह्मण आघाडी,मराठा आघाडी,मातंग आघाडी,भटक्या जाती विमुक्त जमाती आघाडी,होलार आघाडी,मुस्लीम आघाडी,अशा अनेक विविध जाती धर्माच्या आघाड्या रामदास आठवले यांच्या नेतृत्वावरती विश्वास ठेवून संपूर्ण देशभरात रिपब्लिकन पक्षाचे काम जोमाने करत आहेत. नव तरुण युवकांच्या मनामध्ये रामदास आठवले यांचा वाढता आलेख असून अनेक पक्षातील तरुण युवक आठवले यांच्या नेतृत्वाखाली रिपब्लिकन पक्ष भक्कम करण्यासाठी पक्षांमध्ये प्रवेश करत आहेत. याचाच एक भाग म्हणून कोल्हापूर जिल्ह्यातील कोल्हाटी डोंबारी समाजाचे युवा नेतृत्व श्याम लाखे यांनी आज बांद्रा येथील पक्ष कार्यालयात रामदासजी आठवले यांच्या उपस्थितीत तसेच रिपब्लिकन पक्षाचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष अशोक (बापू)गायकवाड तसेच रिपब्लिकन पक्षाचे जिल्हा सचिव सतीश माळगे तसेच ज्येष्ठ नेते सामाजिक कार्यकर्ते राजू भडंगे यांच्या मार्गदर्शनाखाली पक्ष प्रवेश केला.
यावेळी भटक्या जाती विमुक्त जमाती सेलची जबाबदारी देण्याचे आश्वासित नाम. रामदासजी आठवले यांनी श्याम लाखे दिले.
या पक्षप्रवेशाने कोल्हापूर जिल्ह्यातील रिपब्लिकन पक्ष भक्कम झाला असून येत्या जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका नगरपरिषदा या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून कोल्हापूर जिल्ह्यातील विविध पक्षातील युवा तरुण कार्यकर्ते रामदासजी आठवले यांच्या नेतृत्वाखाली पक्षात प्रवेश करणार आहेत. अशी माहिती यावेळी कोल्हापूर जिल्हा रिपब्लिकन पक्षाचे जिल्हा सचिव सतीश माळगे यांनी दिली.
यावेळी रिपब्लिकन पक्षाच्या कला संस्कृतीक सेलचे कबीर नाईकनवरे,रिपाइं मुंबई आयटी सेल चे किशोर कांबळे,रिपब्लिकन पक्षाचे प्रदीप ढाले,रिपब्लिकन पक्षाचे इचलकरंजीचे युवा कार्यकर्ते खंडेराव कुरणे,होलार आघाडीचे जिल्हाध्यक्ष लक्ष्मण पारसे (अण्णा),रिपब्लिकन पक्षाचे युवा कार्यकर्ते बादल हेगडे,रिपब्लिकन पक्षाचे गणेश भोसले,प्रकाश सनदी,अमर मगदूम,दत्तू जावळे,बाबासाहेब लाखे,नामदेव वाघ,पांडूरंग लाखे,सागर लाखे,दिपक लाखे,अंकुश लाखे सह युवा कार्यकर्ते उपस्थित होते.