समाज उन्नतीसाठी महिलांचे योगदान अभूतपूर्व: वसंतराव मुळीक! उजळाईवाडीत महिला दिनी महिलांचा सन्मान

उजळाईवाडी (सुभाष भोसले) : महिलांनी सांघिक शक्तीच्या जोरावर कुटुंबासह समाज उन्नतीसाठीचे योगदान अभूतपूर्व आहे.एकत्र कुटुंब पद्धतीत वात्सल्य निर्माण करण्याचं काम एक स्त्रीचं करू शकते. असे प्रतिपादन अखिल भारतीय मराठा महासंघचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव मुळीक यांनी केले.
उजळाईवाडी येथील यशस्वीनी महिला मंडळ, महिला बचतगट, मराठा महासंघ, यांच्या वतीने विविध क्षेत्रातील महिलांचा महिला दिनानिमित्त सन्मान करण्यात आला. त्या प्रसंगी ते बोलत होते. प्रमुख उपस्थित मराठा महासंघ जिल्हा अध्यक्ष शशिकांत पाटील, युवा अध्यक्ष अवधुत पाटील होते. यामध्ये उजळाईवाडी ग्रामपंचायतीच्या प्रथम महिला सरपंच सावित्री सदाशिव फडतारे, गोकुळ शिरगाव पोलिस ठाण्याच्या सपोनि टि. जे. मगदुम (पोलिस प्रशासन व जनसामान्य नागरिकांचं कर्तव्य), लोकमत मिडिया इलेक्ट्रॉनिक पत्रकार दुर्वा दळवी, .दै.सकाळच्या पत्रकार नंदीनी नरेवाडी (महिला पत्रकारितेतील योगदान), दिपाली मोहन सातपुते( तृतीयपंथी , देहविक्रय महिला, स्थलांतरित कामगार एच. आय. व्ही/ एड्स जनजागृती व एच. आय. व्ही संसर्गित व्यक्तीची काळजी व आधार ), पल्लवी देशपांडे ( मस्क्युलर डिस्ट्रॉफी ) या आजाराबाबत प्रबोधन व काळजी) ब्युटीशियन प्रिया बावडेकर, घागरे तानाजी , प्रा.स्नेहल मिणचेकर यांचा सत्कार करण्यात आला. विविध स्पर्धेतील महिलाना बक्षीस वाटप केले. या कार्यक्रमास यशस्वीनी महिला बचत गट अध्यक्षा शैलजा भोसले,पद्मीनी भेंडीगेरी, सुशिला कासारकर, सुनिता पाटील, वृषाली चव्हाण,नंदा मिरजकर, राजश्री आंबेडे, सुनिता गायकवाड,उज्वला जाधव, अनुराधा घोरपडे, सविता पाटील,संपदा हळ्ळी,सुनंदा भिंगुडे,रागीनी चव्हाण,विजया पाटील,अनिल शिसाळ,यशवंती ग्रँड, शालन पोवार, वैशाली लांडगे,शालन पोवार, शांताबाई पाटील,कमल पाटील,वंदना भडकुंबे, कु-हाडे , अनिता सिशाळ, यशवंती गरड यांची उपस्थिती होती.
उजळाईवाडी येथे जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने आयोजित महिला मेळाव्यास मार्गदर्शन करताना वसंतराव मुळीक, शेजारी माजी सरपंच सावित्री फडतरे, दिपाली सातपुते, दुर्वा दळवी, शैलजा भोसले आदी.