सोनतळीत घरफोडी: लाखो रुपयांचे दागिने आणि रोख रक्कम लंपास!

सोनतळी ता. करवीर,(सलीम शेख): सोनसळी येथे अज्ञात चोरट्यांनी बंद घराचे कुलूप तोडून लाखो रुपयांचे दागिने आणि रोख रक्कम लंपास केली. ही घटना 3 मार्च 2025 रोजी उघडकीस आली.अभिषेक दिलीप गावडे (वय 34)
पत्ता: जुनी सोनतळी, ता. करवीर, जि. कोल्हापूर यांनी फिर्याद दिली आहे.
2 मार्च 2025 ते 3 मार्च 2025 चोरी गेलेला झाली आहे.ऐवज 30 ग्रॅम वजनाचा सोन्याचा माळ (किंमत: 1,80,000 रुपये), 4 ग्रॅम वजनाचे सोन्याचे कानातील टॉप्स (किंमत: 21,600 रुपये),5 ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी (किंमत: 25,000 रुपये), अंदाजे 1 ग्रॅम वजनाच्या लहान बाळाच्या अंगठ्या (किंमत: 2,100 रुपये) बाळाचे पैंजण दोन जोड, बाळाचे हातातील कडे तीन, ब्रेसलेट एक जोड (चांदी, किंमत: 5,000 रुपये), 14,000 रुपये रोख रक्कम स्प्लेंडर मोटार सायकल (MH 09 BH 6606) व कागदपत्रे, सोन्याच्या दागिन्यांचे स्मार्ट कार्ड एकूण नुकसान: 2,47,700 रुपयेची चोरी झाली.अभिषेक गावडे हे 2 मार्च 2025 रोजी सकाळी 6.30 वाजता कुटुंबासह गोव्यातील कामाक्षदेवीच्या दर्शनासाठी गेले होते. 3 मार्च 2025 रोजी सकाळी 11.30 वाजता अभिषेक यांचे चुलत भाऊ प्रसाद संजय गावडे यांनी फोन करून घराचे कुलूप तोडून चोरी झाल्याची माहिती दिली.अभिषेक गावडे यांनी तातडीने घराकडे परत प्रवास केला.सायंकाळी 4.30 वाजता घरी पोहोचल्यावर त्यांना घरातील कपाट उघडे दिसले आणि त्यातील दागिने व रोख रक्कम चोरीला गेल्याचे लक्षात आले. या घटनेबाबत अज्ञात चोरट्यां विरोधात कायदेशीर तक्रार दाखल करण्यात आली आहे.करवीर पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला असून, पुढील तपास सुरू आहे.