लोकनेते स्व.सदाशिवरावजी मंडलिकसाहेब यांचे कार्य समाजासाठी दिशादर्शक आहे! – अतुल जोशी

वार्ताहर: (सुभाष भोसले) कोल्हापूर जिल्ह्याचे लोकनेते खासदार स्व.सदाशिवरावजी मंडलिकसाहेब यांनी कोल्हापूर जिल्ह्यामध्ये शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात केलेले कार्य आजच्या समाजाला दिशादर्शक आहे असे प्रतिपादन कागल तालुका कला क्रीडा शैक्षणिक सांस्कृतिक मंडळ संचलित कागल चे संस्थापक सचिव अतुल जोशी यांनी केले. ते दूधगंगा विद्यालय कागल मध्ये आयोजित लोकनेते स्व. सदाशिवरावजी मंडलिकसाहेब यांच्या पुण्यतिथीनिमित्त कार्यक्रमप्रसंगी ते बोलत होते. लोकनेते खा. सदाशिवरावजी मंडलिक यांच्या प्रतिमेचे पूजन संस्थापक सचिव अतुल जोशी यांच्या हस्ते करण्यात आले.
खासदार स्व. सदाशिवरावजी मंडलिकसाहेब यांनी केलेल्या कार्याचे व विचारांचे अनुकरण प्रत्येकाने केले पाहिजे. समाजाची उन्नती करायची असेल तर सर्वांनी कोणतेही मतभेद न ठेवता एकत्र आले पाहिजे. मंडलिक साहेब यांचे कार्य लोकाभिमुख व आदर्शवत होते.आजच्या राजकारणाची व समाजकरणाची स्थिती पाहता खा. सदाशिवरावजी मंडलिक यांचे विचार व कार्य आजच्या काळात जनतेला दिशादर्शक ठरतील.
यावेळी प्रकाश कदम, आनंदराव पाटील, सुरेश गुरव, लहू पाटील, दिनकर पाटील, शिवाजी पाटील, धोंडिराम पटकारे, बापू दळवी तसेच दूधगंगा विद्यालयातील मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.