जागतिक महिला दिनानिमित्त विविध क्षेत्रातील महिलाचा सत्कार!

कोल्हापूर (सलीम शेख) : कोल्हापूर जय जिजाऊ, जिजाऊ ब्रिगेड व नंदादीप नेत्रालय यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवार दिनांक ७ मार्च २०२५ रोजी ८ मार्च जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून विविध क्षेत्रात काम करणाऱ्या कर्तृत्ववान महिलांचा जिजाऊ प्रेरणा पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला. सदर कार्यक्रम मध्ये IBSF कुंगफू क्ला सेस च्या विद्यार्थिनी, प्रियल माने (ब्लॅक बेल्ट ), शिल्पा लोहार(व्यावसायिक फोटोग्राफर ), डॉ ऋचा पाटील (आय स्पेशलिस्ट), अनिता गवळी (युवा बौद्ध धर्म परिषद महाराष्ट्र व कर्नाटक राज्य कोल्हापूर प्रवक्ता ), मनीषा देसाई (MAC आदींचा Bed Maths ) आदींचा जिजाऊ प्रेरणा पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला. हॉस्पिटल मधील मार्केटिंग डिपार्टमेंट चे अक्षय पाटील व योगेश देसाई यांचा देखील यावेळी सत्कार करण्यात आला.फोटोपूजन नंतर जिजाऊ वंदनाने कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली. यावेळी अध्यक्ष स्थानी जिजाऊ ब्रिगेड जिल्हाध्यक्ष चारुशीला पाटील, जिजाऊ ब्रिगेड विभागीय अध्यक्ष सुवर्णलता गोविलकर, जिजाऊ ब्रिगेड प्रदेश उपाध्यक्ष जयश्री चव्हाण , डॉ ऋचा पाटील(नंदादीप नेत्रालय ), मराठा सेवा संघांचे विभागीय अध्यक्ष अश्विनकुमार वागळे उपस्थित होते.महिला दिनाचे औचित्य साधून हॉस्पिटल मधील महिलांसाठी जिजाऊ ब्रिगेड शहर अध्यक्ष त्वरिता पाटील यांनी विविध स्पर्धाचे आयोजन केले होते. यावेळी इबसफ कुंगफू कराटे क्लासेस च्या मुलींनी प्रत्यक्षिके सादर केली.कार्यक्रमचे सूत्रसंचालन जिजाऊ ब्रिगेड जिल्हा सचिव सुमन वागळे यांनी केले. जिजाऊ ब्रिगेड जिल्हा प्रवक्ता रंजना पाटील यांनी जिजाऊ ब्रिगेड विषयी माहिती दिली व मराठा सेवा संघ विभागीय अध्यक्ष अश्विनकुमार वागळे यांनी महिलांना मार्गदर्शन केले.यावेळी जिजाऊ ब्रिगेड जिल्हा उपाध्यक्ष प्राजक्ता आमले, जिजाऊ ब्रिगेड जिल्हा कार्याध्यक्ष स्मिता कोकाटे, जिजाऊ ब्रिगेड जिल्हा संघटक अनुपमा चव्हाण, जयश्री जाधव, जिजाऊ ब्रिगेड शहर उपाध्यक्ष वनिता निंबाळकर,जिजाऊ ब्रिगेड करवीर तालुका अध्यक्ष कल्पना देसाई व नंदादीप नेत्रालय मधील सर्व महिला स्टाफ मोठया संख्येने उपस्थित होता.