महागडी टू व्हीलर व 70 हजारांचे हेल्मेट असूनही दुचाकीस्वाराचा अपघाती मृत्यू!

आजरा ( कोटा.न्यूज नेटवर्क) : आजरा-आंबोली मार्गावर दुचाकी आणि चारचाकी वाहनांची समोरासमोर धडक झाली. या दुर्घटनेत कोल्हापुरातील तरुण दुचाकीस्वार सिद्धेश विलास रेडेकर (वय २५, रा. माळी कॉलनी टाकाळा, कोल्हापूर) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्यांच्याकडे लाखो रुपये किमतीची दुचाकी आणि तब्बल 70 हजार रुपये किमतीचे अत्याधुनिक हेल्मेट होते, तरीही त्यांचे प्राण वाचू शकले नाहीत.
मिळालेल्या माहितीनुसार, सिद्धेश रेडेकर हे त्यांच्या दुचाकीवरून आजरा-आंबोली मार्गाने जात होते. त्याचवेळी समोरून येणाऱ्या चारचाकी वाहनाची त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक बसली. या अपघातात सिद्धेश गंभीर जखमी झाले आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला.
सिद्धेश यांच्याकडे असलेल्या महागड्या हेल्मेटमुळे अपघाताच्या तीव्रतेचा अंदाज लावणे कठीण झाले आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. आजरा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला असून पुढील तपास सुरू आहे.