पंचायत समिती शिक्षण विभाग कागलची यशस्वी घोडदौड प्रभारी नव्हे तर प्रभावी गट शिक्षणाधिकारी !

वार्ताहर (सुभाष भोसले) मागील एक वर्षापासून कागल तालुक्यामध्ये प्रभारी गटशिक्षणाधिकारी म्हणून काम करत असणाऱ्या सारिका कासोटे यांनी गेल्या एक वर्षभरात 2021 पासून च्या सर्व थकीत कामांची पूर्तता केली आहे आज कार्यालय झिरो पेंडन्सीवर दिसून येत आहे.अभिलेख वर्गीकरण ,शिक्षक सेवा निवृत्ती झालेल्या दिवशीच त्यांच्या हातात सेवानिवृत्तीचे आदेश प्राप्त झालेले आहेत वैद्यकीय प्रकरण गट विमा प्रॉव्हिडंट फंडाचे प्रकरण एकाही शिक्षकांची देयके कार्यालयात थकीत दिसून येत नाहीत तसेच इयत्ता चौथी व सातवी बॅरिस्टर बाळासाहेब खर्डेकर प्रज्ञाशोध परीक्षेमध्ये तालुका अग्रस्थानी आहे. तसेच क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेमध्येही घवघवीत यश मिळवले आहे तसेच यावर्षी कर्मचारी क्रीडा स्पर्धेमध्ये शिक्षकांना संचलन व क्रिकेट स्पर्धेमध्ये सहभागी होऊन प्रथम क्रमांक प्राप्त करण्यात ते यशस्वी झाले आहेत. जिल्ह्यामध्ये मिशन सुरक्षा कवच अंतर्गत शंभर टक्के जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये सीसीटीव्ही बसवण्याचे लोकसहभाग व ग्रामपंचायत वित्त आयोगातून काम सर्वात प्रथम कागल तालुक्याने केले आहे यावर्षी शासनाने हाती घेतलेल्या निपुण महाराष्ट्र या अंतर्गत 99.81% विद्यार्थ्यांची अध्ययनस्तर निश्चिती केलेली आहे. तसेच यावर्षी पंचायत समिती कागल यांनी यांनी लोकसहभागातून प्रज्ञाशोध सराव परीक्षा-आठ, शिष्यवृत्ती परीक्षा सराव परीक्षा-5 घेण्यात आल्या आहेत.तसेच कार्यालयात लोकसहभागातून संगणक,प्रिंटर, आवश्यक साहित्य उपलब्ध करून घेण्यात आले आहे.तसेच शाळांच्या भौतिक विकासातही भरीव लोकसहभाग मिळविण्यात त्या यशस्वी झाल्या आहेत. तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धा सांस्कृतिक स्पर्धा व विज्ञान प्रदर्शनाकरता अनेक शिक्षक, स्थानिक परिसरातील कंपन्या व देणगीदार सक्षमपणे पंचायत समितीच्या उपक्रमात सहभागी झाले आहेत.स्पर्धाकार्यालयात प्रत्येकास सहकार्याची व सन्मानाची वागणूक दिली जाते.शिक्षकांबरोबरच आज विद्यार्थी ही गटशिक्षणाधिकारी यांना भेटण्यासाठी उत्सुक असतात.तसेच राज्य व जिल्हास्तरावरुन राबविण्यात सर्व शासकीय उपक्रम व योजनाची प्रभावीपणे अंमलबजावणी केली जात आहे. शाळा भेटी तपासणी विविध सहशालेय उपक्रम यांच्या माध्यमातून प्रभारी गटशिक्षणाधिकारी कासोटे या पालक नागरिक यांना आपल्यातीलच वाटतात.
परसबाग योजनेमुळे विद्यार्थ्यांना सकस व सेंद्रिय भाजीपाला मिळत आहे पालक व नागरिक अत्यंत आनंदाने शाळेचा उपक्रमांमध्ये सहभागी होत आहेत. यामध्ये सर्व प्राथमिक व माध्यमिक सर्व संघटनांना एकसंघ बांधून चालू असलेले काम याबाबत सर्व शिक्षकांमधून समाधान व्यक्त होत आहे. सर्वसमावेशक तणावमुक्त कार्यप्रणाली व विद्यार्थी प्रिय अधिकारी यामुळेच त्या प्रभारी नाही तर प्रभावी अधिकारी म्हणून जनमानसात व शिक्षक वर्गात वेगळीच प्रतिमा निर्माण झाली आहे.