शां.कृ.पंत वालावलकर हायस्कूलमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना जयंतीदिनी अभिवादन.

कोल्हापूर (सुभाष भोसले) : आंतरभारती शिक्षण मंडळ संचलित मुक्त सैनिक वसाहतीतील शां.कृ. पंत वालावलकर हायस्कूल मध्ये भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, समाजसुधारक, अर्थशास्त्रज्ञ, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 134 वी जयंती विविध उपक्रमाने साजरी करण्यात आली. यावेळी प्रमुख वक्ते श्री. अनिल चव्हाण व सर्व मान्यवर यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला बुलेटिन प्रकाशन, सामुदायिक संविधान वाचन करण्यात आले.त्यानंतर संविधानाची महती सांगणारे एक अभंग भारताचा प्राण आहे संविधान हे गीत इयत्ता सहावीच्या विद्यार्थ्यांनी सादर केला. कु. स्वरूप पाटील, सिद्धी वडर व नईम देसाई या विद्यार्थ्यांनी आंबेडकरांविषयीचे विचार मांडले. यानंतर संविधान जागृती करण्यासाठी एक पथनाट्य ‘माझा मान, माझे संविधान’ सादर करण्यात आले . यानंतर प्रमुख वक्ते अनिल चव्हाण व प्रशालेचे पर्यवेक्षक श्री. एस पी पाटील यांनी आपल्या मनोगतात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या कार्याचा आढावा घेतला. मुख्याध्यापिका सौ वृषाली कुलकर्णी यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाचे आयोजन इयत्ता सहावी क वर्गशिक्षक सौ. एन. ए.पाटील व विद्यार्थी यांच्यावतीने करण्यात आले होते. कार्यक्रमावेळी शाळेचे उपमुख्याध्यापक आर पी मोरे , जिमखाना प्रमुख राजेंद्र बनसोडे , शिक्षक प्रतिनिधी प्रशांत भोसले, ज्येष्ठ शिक्षक राजेश वरक, संतोष पोवार तसेच सर्व शिक्षक ,शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला.