गोकुळ शिरगाव येथील सचिनकुमार पाटील यांना महाराष्ट्र उद्योजकता पुरस्काराने सन्मानित!

गोकुळ शिरगाव : प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेचे सर्वाधिक इन्स्टॉलेशन करून उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल गोकुळ शिरगाव येथील एस.पी. सोलरचे सचिनकुमार अशोक पाटील यांना ‘महाराष्ट्र उद्योजकता पुरस्कार २०२५’ ने सन्मानित करण्यात आले. अभिनेत्री वर्षा उसगावकर यांच्या हस्ते सचिनकुमार पाटील यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
प्रायोजक ‘रिसील.इन’ यांच्या वतीने २१ मार्च २०२५ रोजी नाशिक येथील सोमा वाईन व्हिलेज या आलिशान हॉटेलमध्ये हा भव्य पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात विविध क्षेत्रांतील यशस्वी उद्योजकांनी सहभाग नोंदवला. जीएसटीचे उपायुक्त समाधान महाजन हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
एस.पी. सोलरच्या कोल्हापूर, सांगली, सातारा या तीन शाखा असून, कोल्हापुरात सौरऊर्जा विक्री आणि सेवा क्षेत्रात आघाडीवर असल्यामुळे सचिनकुमार पाटील यांची ‘महाराष्ट्र उद्योजकता पुरस्कार २०२५’ साठी निवड करण्यात आली.
बँकिंग, आरोग्यसेवा, माध्यम आणि राज्य व केंद्र सरकारचे अधिकारी यांसारख्या विविध क्षेत्रांतील मान्यवरांच्या उपस्थितीत हा पुरस्कार सोहळा पार पडला. यावेळी सचिनकुमार पाटील, प्रवीण विष्णू पाटोळे, जयेश ठाकूर यांच्यासह ४० हून अधिक यशस्वी उद्योजकांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.