गोकुळ शिरगावमध्ये गोशिमाच्या आरोग्य शिबिरात कामगारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; २७८ जणांना लाभ!

गोकुळ शिरगाव (सलीम शेख ): येथील गोकुळ शिरगाव औद्योगिक वसाहतीमधील कर्मचाऱ्यांसाठी गोशिमाच्या वतीने एका मोफत आरोग्य तपासणी व रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. उद्योजक उमेश कुलकर्णी यांच्या स्मरणार्थ आयोजित या शिबिरात २७८ कामगारांनी सक्रिय सहभाग घेतला आणि आरोग्य तपासणीचा लाभ घेतला.
गोशिमा, आकाश दिप नेत्रालय, स्व. तात्यासाहेब कोरे दंत महाविद्यालय, महात्मा गांधी ब्लड सेंटर आणि नवे पारगाव यांच्या संयुक्त विद्यमाने हे शिबिर यशस्वी झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गोशिमाचे अध्यक्ष स्वरूप कदम होते. त्यांनी उमेश कुलकर्णी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली.
या आरोग्य शिबिराच्या आयोजनात गोशिमाचे अध्यक्ष स्वरूप कदम, उपाध्यक्ष सुनील शेळके, मानद सचिव संजय देशिंगे, खजिनदार अमोल यादव, कोल्हापूर फौंड्री अँड इंजिनिअरिंग क्लस्टरचे अध्यक्ष दिपक चोरगे, संचालक नचिकेत कुंभोजकर, रणजीत मोरे, सल्लागार संचालक श्रीकांत पोतनीस, अरुण आराध्ये, उद्योजक योगेश कुलकर्णी, डॉ. स्वप्नील जाधव, डॉ. गुणाजी नलवडे (वैद्यकीय अधिकारी, सेवा दवाखाना, गोकुळ शिरगाव), अजिंक्य चौगुले, रुक्मिणी खोत, दिपक गोनूगडे, वैभव सडोलकर यांच्यासह अनेक कर्मचारी आणि कंपनी कामगारांनी मोलाचे योगदान दिले.