हातकणंगले येथे बांधकाम कामगारांना गृहउपयोगी वस्तू संचाचे वाटप!

अतिग्रे ता. हातकणंगले (सलीम शेख): महाराष्ट्र इमारत व बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ, मुंबई यांच्यामार्फत हातकणंगले विभागातील नोंदणीकृत 1100 बांधकाम कामगारांना गृहउपयोगी वस्तू संचाचे वाटप करण्यात आले. हातकणंगले विधानसभा मतदारसंघाचे आमदार दलितमित्र डॉ. अशोकराव माने (बापू) यांच्या विशेष प्रयत्नांतून ‘साई मंगल कार्यालय, अतिग्रे’ येथे हा कार्यक्रम संपन्न झाला.
आमदार डॉ. अशोकराव माने (बापू) यांच्या हस्ते बांधकाम कामगारांना गृहउपयोगी वस्तू संचाचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमात ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते राज शेख, आंतरराष्ट्रीय खेळाडू रोहित बांगवडे, युवा नेते शोएब शेख, जैद मुजावर, स्विय सहायक सुहास राजमाने, बांधकाम कामगार प्रतिनिधी किरण माने, सुभाष लोखंडे, संतोष माळी, नितेश दिक्षांत, अभिजीत आवळे, संतोष खरात, भैय्यासाहेब धनवडे, महेश कोळी, विजय हेगडे यांच्यासह मोठ्या संख्येने बांधकाम कामगार व महिला उपस्थित होते.
या उपक्रमामुळे बांधकाम कामगारांना मोठा दिलासा मिळाला असून, आमदार डॉ. अशोकराव माने (बापू) यांच्या प्रयत्नांचे कामगारांनी कौतुक केले.