इचलकरंजी येथील भोने मळ्यात विठ्ठल-रुक्मिणी आणि संत गोरोबा काका मंदिराचा कलशारोहण सोहळा उत्साहात संपन्न!

इचलकरंजी (सलीम शेख) : भोने मळा येथे संत गोरा कुंभार सांस्कृतिक मंडळाच्या वतीने आयोजित विठ्ठल रुक्मिणी आणि संत गोरोबा काका मंदिराचा कलशारोहण सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. याच वेळी संत शिरोमणी गोरोबा काका कुंभार यांची पुण्यतिथी देखील साजरी करण्यात आली.
यानिमित्ताने ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण आणि अखंड हरीनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला इचलकरंजी जनता सहकारी बँकेचे चेअरमन स्वप्निलदादा आवाडे यांनी विशेष उपस्थिती दर्शवत विठ्ठल रुक्मिणी आणि संत गोरोबा काकांचे दर्शन घेतले.
या सोहळ्यामध्ये ह.भ.प. माने महाराज यांचे प्रवचन झाले. संत गोरा कुंभार सांस्कृतिक मंडळाचे अध्यक्ष रघुनाथ कुंभार, उपाध्यक्ष संतराम कुंभार, सचिव सुधाकर कुंभार, मारुती कुंभार, विलास कुंभार, महेश कुंभार, मंगेश कुंभार, प्रकाश कुंभार, विजय कुंभार, विनायक काळे, सुशांत मंडावले यांच्यासह समस्त कुंभार समाज आणि वारकरी संप्रदायातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. भक्तिमय वातावरणात हा कलशारोहण सोहळा आणि पुण्यतिथी कार्यक्रम मोठ्या श्रद्धेने संपन्न झाला.