इंगळीतील सहा मोठ विहिरींच्या भु संकलनामुळे मुख्य रस्ता खचला, वाहतूक ठप्प; प्रशासनाला जाग आणण्यासाठी उपोषण!

इंगळी (सलीम शेख) : दि. १६ इंगळी येथे सहा मोठ विहीर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या विहिरीसाठी केलेल्या भु संकलनामुळे गावातील मुख्य रस्ता दिनांक २५ मार्च २०२५ रोजी खचला आहे. यामुळे या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे बंद झाली असून, नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
विशेष म्हणजे, या विहिरीचे कोणतेही काम सध्या चालू नाही. त्यामुळे भु संकलन होऊन रस्ता खचला असतानाही प्रशासनाकडून कोणतीही दखल घेतली जात नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे.
या गंभीर परिस्थितीकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी आणि त्यांना त्वरित कार्यवाही करण्यास भाग पाडण्यासाठी, गावातील नागरिक आता उपोषणाच्या मार्गावर उतरले आहेत. येत्या २८ एप्रिल २०२५ रोजी उपोषण केले जाणार आहे. या उपोषणासाठी प्रशासनाला निवेदन देण्यासाठी केशव पाटील, शहानुर नाईकवाडी, बबन पाटील यांच्या नेतृत्वाखाली गावकऱ्यांनी सह्यांची मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळत असून, प्रशासनाला तातडीने कार्यवाही करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
आता प्रशासनाने या गंभीर