कागलमध्ये काश्मीरमधील पहलगाम येथे पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा शिवसेनेचा (ठाकरे)निषेध!

कागल ( सलीम शेख): काश्मीरमधील पहलगाम येथे पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा निषेध करण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने कागल तहसील कार्यालयाच्या प्रांगणात निदर्शने करण्यात आली. यावेळी पाकिस्तानविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
उपजिल्हाप्रमुख संभाजी भोकरे यांनी पाकिस्तानवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली. ते म्हणाले, “भारत सरकारने पाकिस्तानातील दहशतवादी तळ उद्ध्वस्त करण्यासाठी लष्करी कारवाई करावी. पाकिस्तानचे नाव जगाच्या नकाशावरून कायमचे पुसून टाकावे.”
यावेळी तालुकाप्रमुख जयसिंग टिकले, अशोक पाटील, अजित मोडेकर, राजेंद्र साळुंखे, म्हाळू करीकट्टे, वैभव आडके, समीर देसाई, संदीप कांबळे, नितीश डावरे, संभाजी सावंत, अमृत पाटणकर यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते.
निदर्शनानंतर तहसीलदार अमरदीप वाकडे यांना मागणीचे निवेदन देण्यात आले.