महाराष्ट्र ग्रामीण
कागलमध्ये अवकाळी पावसाचा तडाखा; मंदिरासमोरील झाड कोसळून वाहनांचे नुकसान

कागल (सलीम शेख) : कागल शहरात दुपारी दोन वाजल्यानंतर अचानक अवकाळी पाऊस आणि जोरदार वारे सुरू झाले. या पावसामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली. कागलमधील लक्ष्मी टेकडीजवळील लक्ष्मी मंदिराच्या शेडमध्ये काही नागरिक पावसापासून बचाव करण्यासाठी थांबले होते. त्यांनी त्यांची वाहने मंदिरासमोर पार्क केली होती.
दरम्यान, मंदिरासमोरील एक मोठे झाड अचानक कोसळले. हे झाड अंदाजे दहा ते बारा दुचाकी आणि एका चारचाकी वाहनांवर पडले. या दुर्घटनेत दुचाकी वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे, तर चारचाकी वाहनांचे किरकोळ नुकसान झाले आहे. यामध्ये कोणीही जखमी नाही.पाऊस थांबल्यानंतर नागरिकांनी आपापली वाहने बाजूला काढली.