सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांचा कोल्हापूर जिल्हा दौरा!

कोल्हापूर (सलीम शेख) : दि. १८ एप्रिल २०२५: सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर १८ एप्रिल २०२५ रोजी कोल्हापूर जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यात ते विविध विकासकामांचे उद्घाटन आणि कार्यक्रमांना उपस्थित राहणार आहेत.
दौऱ्याचा तपशील खालीलप्रमाणे:
* सकाळी ७:०० वा: श्री छत्रपती शाहू महाराज टर्मिनल, कोल्हापूर येथे आगमन.
* सकाळी ७:३० वा: शासकीय विश्रामगृह, कोल्हापूर येथे आगमन व राखीव वेळ.
* सकाळी १०:३० वा: शिवाजी विद्यापीठ येथे भगवान महावीर अध्यासन प्रारंभिक बांधकाम उद्घाटन कार्यक्रमास उपस्थिती.
* सकाळी ११:३० वा: शिवाजी विद्यापीठ येथे ग्राहक कार्यकर्ता एक दिवसीय कार्यशाळा कार्यक्रमास उपस्थिती.
* दुपारी १२:३० वा: वालावलकर ट्रस्ट हॉस्पिटल, उद्यमनगर येथे एम.जे.पी.जे.ए.वाय. लोकार्पण व शुभारंभ सोहळा कार्यक्रमास उपस्थिती.
* त्यानंतर: सोयीनुसार, गारगोटी (भुदरगड) येथील आनंद निवास येथे आगमन व राखीव वेळ.
मंत्री आबिटकर यांच्या या दौऱ्यात कोल्हापूर जिल्ह्यातील आरोग्य सेवा आणि शैक्षणिक क्षेत्रात महत्त्वपूर्ण विकासकामांना चालना मिळणार आहे.