महाराष्ट्र ग्रामीण

तामगावात श्री स्वामी समर्थ महाराज प्रकटदिन सोहळा उत्साहात साजरा!

तामगाव (सलीम शेख) : तामगावमध्ये श्री स्वामी समर्थ महाराज प्रकटदिन सोहळा मोठ्या उत्साहात व धूमधड्याकात साजरा करण्यात आला. सकाळपासूनच सेवा केंद्राचे संचालक व सभासद वर्ग स्वामी सेवेत मग्न होते. सकाळी अक्कलकोट स्वामी समर्थ महाराज प्रतिपादुका आगमन सोहळा भक्ती भावामध्ये संपन्न झाला. त्यानंतर स्वामी पादुका, स्वामी उत्सवमूर्ती व स्वामी प्रतिमा यास अध्यक्ष मीनाक्षी दुर्गुळे व रणजित दुर्गुळे केंद्राचे संस्थापक व मार्गदर्शक यांच्या हस्ते अभिषेक करण्यात आला. होम हवन स्वामी याग पूजन करण्यात आले. सर्व स्वामी भक्तांच्या उपस्थिती 12.15 मिनिटांनी स्वामी प्रकटदिन पुष्पवृष्टी मधून भजनाच्या गजरात पार पडला. स्वामी दर्शनाचा लाभ हजारो भक्तांनी सहकुटुंब सहपरिवार येऊन घेतला.

प्रकटदिनानिमित्त 4.30 वाजता गावातून दिंडीचे आयोजन करण्यात आले. यामध्ये जास्तीत जास्त महिलांनी भाग घेतला. सायंकाळी 07.00 वाजता सुनील लाड गुरुजी यांचा व्याख्यानाचा कार्यक्रम झाला. यावेळी खूप गर्दी जमली. स्वामी प्रकटदिनाला फटाक्यांची अतिशबाजी करण्यात आली. संध्याकाळी आरती करून महाप्रसाद सुरू करण्यात आला. सर्व हजारो स्वामी भक्तांनी प्रसादाचा लाभ घेतला. प्रकटदिन सोहळा मोठ्या उत्साहात साजरा झाला.
या कार्यक्रमासाठी DMR फॉउंडेशन व सेवा केंद्राचे अध्यक्ष मीनाक्षी दुर्गुळे, उपाध्यक्ष संगीता पाटील, सेक्रेटरी मालती सावंत, खजिनदार वर्षा सुर्वे व अनिल खामकर, जितेश तटकरे, युवराज देसाई सुधाकर यादव सर्व संचालक मंडळ यांनी हा कार्यक्रम चांगल्या पद्धतीने होण्यासाठी खूप परिश्रम घेतले. मार्गदर्शक व संस्थापक रणजित दुर्गुळे यांनी सर्व मान्यवर व स्वामी भक्त व उपस्थित यांचे आभार मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button