शाहू सत्यशोधक जागृती परिषद: कोल्हापुरात सामाजिक न्यायाचा जागर!

कोल्हापूर ( सलीम शेख) : छत्रपती शाहू महाराज यांच्या 131 व्या राज्याभिषेक दिनानिमित्त भारत मुक्ती मोर्चा आणि छत्रपती क्रांती सेना यांच्या संयुक्त विद्यमाने कसबा बावडा येथील शाहू जन्मस्थळी ‘शाहू सत्यशोधक जागृती परिषदे’चे आयोजन करण्यात आले होते. या परिषदेत कोल्हापूरचे ब्राह्मणीकरण, दंगली, सध्याची पेशवाई आणि समता यांसारख्या सामाजिक विषयांवर चर्चा झाली.
आरक्षणाचा मुद्दा केंद्रस्थानी होता.
परिषदेत छत्रपती शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी गरीब बहुजनांना आरक्षण मिळावे यासाठी केलेल्या प्रयत्नांवर प्रकाश टाकण्यात आला. आर्थिक दृष्ट्या बहुजन कसे आहेत हे सर्वांना कळावे यासाठी जनगणना होणे आवश्यक आहे, असा मुद्दा मांडण्यात आला. वामन मेश्राम: यांनी शाहू महाराजांचे विचार आत्मसात करण्याचे आणि फुले-आंबेडकरांचे विचार समाजात रुजवण्याचे महत्त्व सांगितले. तसेच त्यांनी सरकारवर टिका करत EMV मशीनच्या घोटाळ्या बद्दल सांगितले. प्राचार्य जे.के. पवार: यांनी आरक्षणासाठी लढा देण्याचे आणि शाहू-फुले-आंबेडकरांचे विचार आत्मसात करण्याचे आवाहन केले.
वसंत मुळीक: यांनी छत्रपती शाहू महाराजांच्या जन्मस्थानाच्या नूतनीकरणासाठी १७ वर्षे लढा दिल्याचे सांगितले.
इंद्रजीत सावंत: इतिहासकार व संशोधक इंद्रजीत सावंत यांनी शाहू महाराजांच्या काळातील ब्राह्मणवादी विचारधारेवर प्रकाश टाकला व शाहू महाराजांनी संयमाने दिलेल्या उत्तरांचा उल्लेख केला.अलीकडच्या काळात थोर लोकांचा मोठ्या प्रमाणात अपमान होत आहे, याबद्दल चिंता व्यक्त करण्यात आली.सध्याचे सरकार लोकांच्या समस्या निर्माण करून त्यांना संभ्रमात टाकत आहे, असा आरोप करण्यात आला.
मुस्लिम महिला सातमा जमादार यांच्या हस्ते वामन मेश्राम यांचा सत्कार करण्यात आला. वामन मेश्राम यांनी इतिहासकार इंद्रजीत सावंत यांचा सत्कार केला. देशात ब्राह्मण राज्य सुरू असल्याचा आरोप करण्यात आला.९ एप्रिल रोजी जेलभरो आंदोलन आणि १ जुलै रोजी देश बंद आंदोलन करण्याची घोषणा करण्यात आली. या परिषदेला बहुजन समाजातील अनेक लोक उपस्थित होते.या परिषदेत छत्रपती शाहू महाराजांच्या सामाजिक कार्याचा गौरव करण्यात आला. त्यांनी गरीब आणि शोषित लोकांसाठी केलेल्या कार्याची आठवण करून देण्यात आली. तसेच, त्यांच्या विचारांचा प्रसार करण्याची गरज व्यक्त करण्यात आली.यावेळी वामन मेश्राम, प्राचार्य जे.के पवार,वसंत मुळीक,बाबा महाडिक, इतिहासकार व संशोधक इंद्रजीत सावंत, हर्षल सुर्वे इतर अनेक मान्यवर उपस्थित होते