कोगील बुदुर्ग येथे हनुमान जयंती निमित्त भव्य निकाली कुस्ती मैदान गुरुवार दिनांक १७ एप्रिल २०२५ रोजी संपन्न झाले!

कोगील (सलीम शेख) : कोगीलचे युवा उद्योजक सचिन पाटील, गोकुळ शिरगाव पोलिस ठाणेच्या टी. जे. मगदूम , सरपंच गुडाळे, पोलीस पाटील तानाजी बनकर, माजी पोलीस पाटील रामगोंडा पाटील, युवराज पाटील, विष्णू चौगुले, श्रीकांत गुडाळे ,निवास ताकमारे ,तानाजी ताकमारे, उमेश गणेशाचार्य, राजू घराळ विविध संस्थांचे पदाधिकारी कनेरीचे पोलीस पाटील संग्राम पाटील, नेर्लीचे माजी सरपंच व गोकुळचे संचालक प्रकाश पाटील ,सागर पाटील ,कंदलगावचे सरपंच राहुल पाटील, विजय मोरे, रामचंद्र रेवडे या मान्यवरांच्या उपस्थित गावाचे वस्ताद शिवाजी गुडाळे, आनंदा चौगुले, भीमराव चौगुले ,बाळू खोत, विष्णू शेळके, लक्ष्मण पाटील, जयसिंग पाटील यांच्या उपस्थितीत हनुमान चा प्रतिमा पूजन करून आखाडा पूजन करण्यात आले व कुस्ती प्रारंभ झाली.
आजच्या या कुस्तीमध्ये प्रथम क्रमांक पैलवान शशिकांत बोंगार्डे व दुसरा क्रमांक रोहन पैलवान यांनी पटकावला. महिला प्रथम कुस्ती क्रमांक सुकन्या मिठारी हिने बाजी मारली. प्रेक्षणीय कुस्तीमध्ये शुभम कोळेकर ,कुमार बनकर ,प्रणव चौगुले ,कार्तिक चौगुले गौतम बनकर, गणेश ताकमारे ,आदित्य ताकुमारे ,पृथ्वीराज मोहिते यांनी यांच्या प्रतिस्पर्धीवर मात करून प्रेक्षकांची मने जिंकली मैदानात लहान मोठ्या शंभर होऊन शंभरहून कुस्त्या पार पडल्या. पंच म्हणून शाहू साखर कारखान्याचे सर्जेराव पाटील, भैरवनाथ आरेकर ,प्रकाश चव्हाण, दत्ता एकशिंगे यांच्यासह तानाजी कुराडे ,बाळू राजगिरे स्वागत पाटील, सर्जेराव पाटील कोपर्डेकर, गोविंद बोडके, संजय शेळके ,राजू बनकर यांनी काम पाहिले. निवेदन कृष्णा चौगुले (राशिवडे) व सुकुमार माळी (इचलकरंजी) यांनी आपल्या बुलंद आवाजाने मैदानात रंगत आणली. तर हलगी वादक सचिन गणेशआचार्य व सहकारी यांनी शौकिनाकडून वाहवा मिळवली.
कुस्ती हेच जीवन या यूट्यूब चैनलचे प्रतिनिधी निकम खोत यांनी कुस्ती घराघरात पोहोचवले संपूर्ण विजेतांना बक्षीस वाटपाचे काम रावसाहेब पाटील सर, बाळकृष्ण खोत सर, अजित ताकमारे आदींनी आपली जबाबदारी चौक पार पाडली. मैदान यशस्वी करण्यासाठी अजित चौगुले, धनाजी मोहिते, महादेव ताकुमारे, कृष्णात पाटील, ज्योतीराम शेळके, तानाजी ताकमारे ,दीपक ताकमारे ,साताप्पा चौगुले यांनी विशेष परिश्रम घेतले मैदानासाठी विशेष व मोलाचे सहकार्य जेसीबी मालक युवराज पाटील, रोटअर मालक विशाल पाटील, ट्रॅक्टर मालक नामदेव पाटील ,निवास पाटील, शिवाजी पाटील ,शशिकांत गुडाळे तुकाराम राठोड यांचे सहकार्य लाभले.