महाराष्ट्र ग्रामीण

वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांची डी.के.टी.ई. संस्थेला सदिच्छा भेट; इचलकरंजीतील यंत्रमाग उद्योगाच्या अडचणींवर चर्चा!

इचलकरंजी (सलीम शेख ) : महाराष्ट्र राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांनी कोल्हापूर जिल्हा दौऱ्यादरम्यान इचलकरंजी येथील डी.के.टी.ई. संस्थेला सदिच्छा भेट दिली. यावेळी सहकार महर्षी माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे, माजी मंत्री प्रकाशआण्णा आवाडे, माजी नगराध्यक्षा किशोरीताई आवाडे, कल्लाप्पाण्णा आवाडे इचलकरंजी जनता सहकारी बँकेचे चेअरमन स्वप्निलदादा आवाडे, डी.के.टी.ई. चे संचालक रवी आवाडे आणि आदित्य आवाडे यांनी त्यांचे स्वागत केले.


या भेटीदरम्यान, माजी मंत्री प्रकाशआण्णा आवाडे यांनी संस्थेची माहिती देत इचलकरंजी येथील यंत्रमाग उद्योगाच्या विविध अडचणी मंत्र्यांसमोर मांडल्या. इचलकरंजीतील वस्त्रोद्योग हा राज्याच्या अर्थव्यवस्थेत महत्त्वाचा वाटा उचलतो, मात्र सध्या अनेक समस्यांमुळे हा उद्योग अडचणीत आला आहे, असे त्यांनी सांगितले.


यावेळी वस्त्रोद्योग महामंडळाचे अध्यक्ष अशोक स्वामी, माजी नगरसेवक सुनील पाटील, प्रकाश दत्तवाडे, प्रकाश मोरे, पॉवरलूम असोसिएशनचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील, राजू पाटील, सर्जेराव पाटील, रफिक खानापुरे, बाळासो कलागते, अहमद मुजावर, इंदिरा महिला सूत गिरणीच्या व्हाईस चेअरमन संगीत नरंदे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button