पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ मलकापूरमध्ये हिंदू-मुस्लिम एकवटले!

मलकापूर ता. शाहूवाडी (सलीम शेख) : जम्मू-कश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ कोल्हापूर जिल्ह्यातील वातावरण संतप्त झाले आहे. या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर मलकापूर (ता. शाहूवाडी) येथे हिंदू आणि मुस्लिम समाजाच्या वतीने एकत्रित निदर्शने करण्यात आली.
या निषेध आंदोलनात मुस्लिम समाजाचे अध्यक्ष बाळासाहेब जमादार, भाई राजाराम मगदूम, ॲड. प्रणव थोरात, दस्तगीर आत्तार, भाई राजेंद्र देशमाने, गोपाळ पाटील, अरुण पाटील, सुरेश म्हाउटकर, प्रकाश पाटील यांच्यासह मोठ्या संख्येने हिंदू व मुस्लिम कार्यकर्ते सहभागी झाले होते.
उपस्थित आंदोलकांनी दहशतवादी हल्ल्याचा तीव्र निषेध केला आणि या भ्याड हल्ल्यातील दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली. हिंदू आणि मुस्लिम समाजाच्या एकजुटीने केलेल्या या निदर्शनामुळे सामाजिक सलोख्याचा संदेश देण्यात आला. कोल्हापूर जिल्ह्यातील इतर गावे आणि तालुक्यांमध्येही या हल्ल्याच्या निषेधार्थ विविध प्रकारची आंदोलने आणि निषेध सभा पार पडल्या.