राजेंद्र ढाले यांना राज्यस्तरीय जनसेवा समाजरत्न पुरस्कार जाहीर!

गोकुळ शिरगाव -प्रतिनिधी नेर्ली (ता.करवीर) युवा क्रांती प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य यांच्यावतीने सामाजिक कार्यकर्ते जनहित पत्रकार संघाचे सचिव आयु.उत्तम कांबळे फौंडेशनचे उपाध्यक्ष राजेंद्र ढाले विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय सामाजिक कार्यातिल योगदानाबद्दल राज्यस्तरीय जनसेवा समाजरत्न प्रेरणा पुरस्कार जाहीर झाला असून वितरण समारंभ दि.4 मे रोजी मान्यवरांच्या हस्ते स्वागत हाॅटेल परिते (ता.करवीर) येथे आयोजित करण्यात आला आहे.
राजेंद्र ढाले हे सामाजिक ,आयु उत्तम कांबळे फौंडेशन, महाराष्ट्र जनहित पत्रकार संघ रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट ) माध्यमातून समाजातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय निस्वार्थीपणे कामगीरी करीत असलेल्या सामाजिक कामाची दखल घेऊन त्यांची पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.त्याना जाहीर झालेल्या पुरस्कारासाठी त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे