योजनांचा लाभ घेण्यासाठी रिपब्लिकन पक्षाशी संपर्क साधा – सतीश माळगे
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) कोल्हापूर

इचलकरंजी (सलीम शेख ) : महाराष्ट्र शासनामार्फत बांधकाम क्षेत्रातील असंघटित कामगारांसाठी अनेक कल्याणकारी योजना राबवल्या जातात. यामध्ये आरोग्य सुविधा, शिक्षणासाठी शिष्यवृत्ती, घरबांधणीसाठी घरकुल योजना, कामाच्या ठिकाणी सुरक्षिततेसाठी साहित्य वाटप आणि संसारोपयोगी भांडी वाटप यांसारख्या योजनांचा समावेश आहे. या योजनांचा लाभ घेण्यासाठी रिपब्लिकन पक्षाशी संपर्क साधावा, असे आवाहन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) चे कोल्हापूर जिल्हा सचिव सतीश माळगे (दादा) यांनी केले आहे.
शाहूनगर चंदूर, इचलकरंजी येथे आयोजित बांधकाम कामगारांना भांडी वाटप कार्यक्रमात ते बोलत होते. या कार्यक्रमात ७५ ते ८० बांधकाम कामगार कुटुंबांना संसारोपयोगी भांडी आणि कामगारांना सुरक्षा किटचे वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी चंदूरचे उपसरपंच फिरोज शेख, रिपब्लिकन सेनेचे शिरीष थोरात, रिपब्लिकन पक्षाचे बादल हेगडे, दस्तगीर मुजावर, उस्मान मुजावर, सद्दाम मुजावर यांच्यासह बांधकाम कामगार आणि रिपब्लिकन पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.