कणेरीवाडी दलित वस्ती निधी गैरव्यवहार: रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आ) चा जिल्हा परिषदेवर धडक मोर्चा!

कणेरीवाडी (सलीम शेख ) :कोल्हापूर जिल्ह्यातील कणेरीवाडी (ता. करवीर) आणि इतर अनेक गावांमध्ये दलित वस्तीच्या निधीचा गैरवापर झाल्याचा आरोप करत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आ) च्या युवक आघाडीने आज जिल्हा परिषदेवर धडक मोर्चा काढला. जिल्हाध्यक्ष उत्तम कांबळे यांच्या आदेशाने काढण्यात आलेल्या या मोर्चामध्ये युवा कार्यकर्त्यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस. यांना निवेदन सादर केले.
निवेदनात, युवा आघाडीने संबंधित ग्रामसेवक, सरपंच, अधिकारी-कर्मचारी आणि कंत्राटदारांवर तातडीने कारवाई करून त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे. युवा जिल्हाध्यक्ष अविनाश शिंदे यांनी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना धारेवर धरत, कारवाई न झाल्यास जिल्हा परिषदेसमोर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला.
मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस. यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत, सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याचे आश्वासन दिले.
या मोर्चामध्ये मातंग आघाडीचे जिल्हाध्यक्ष संजय लोखंडे, आयटी सेलचे उपाध्यक्ष अमर कांबळे, युवा आघाडीचे उपाध्यक्ष संतोष कांबळे, युवा नेते प्रोज्योक्त सूर्यवंशी, टेंबलाईवाडी शाखा अध्यक्ष योगेश आजाटे, अविनाश कांबळे, मनोहर कांबळे, सर्जेराव कांबळे यांच्यासह रिपब्लिकन पक्षाचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते.
प्रमुख मागण्या दलित वस्ती निधी गैरव्यवहारातील दोषींवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत.
संबंधित ग्रामसेवक, सरपंच, अधिकारी-कर्मचारी आणि कंत्राटदारांवर तातडीने कारवाई करावी.दलित वस्ती निधीचा योग्य वापर सुनिश्चित करावा. जिल्हा परिषदेने तातडीने कारवाई न केल्यास तीव्र आंदोलन छेडले जाईल