महाराष्ट्र ग्रामीण

राजकारण करा पन ते समाज हिताचे आसले पाहिजे! – सतिश माळगे

उचगांव (सलीम शेख) : हौसाई बंडू आठवले चॅरिटेबल ट्रस्ट कोल्हापूर आयोजित छत्रपती शिवाजी महाराज आणि डॅा.बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंती निमित्त छ. शिवाजी महाराज नगर,मनेरमाळ,उचगांव येथे देशभरात गाजत असलेला कबीर नाईकनवरे प्रस्तुत “सलाम संविधान “ संविधान,आणि बहुजन महामानवांच्या क्रांतीगीतांचा प्रबोधत्मक उर्जादायी कार्यक्रम हौसाई बंडू आठवले चॅरिटेबल ट्रस्ट चे अध्यक्ष तथा रिपब्लिकन पक्षाचे जिल्हा सचिव मा.सतिश माळगे(दादा) व सामाजिक कार्यकर्ता अर्चना माळगे यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.यावेळी बोलत असताना सतिश माळगे म्हणाले ज्यांना राजकारण करायचं आहे त्यांनी खुशाल राजकारण कराव पन ते राजकारण हे समाजाच्या हितासाठी असले पाहिजे अन्यथा आपल्यातील बे की दुफळी ही चळवळ संपवण्यास कारणीभूत ठरेल डॅा.बाबासाहेब आंबेडकरांचं कार्य हे खुप महान आहे

बाबासाहेबांची चळवळ पुढे न्यायची असेल तर समाजामध्ये चळवळी बदल प्रेम भाव आपुलकी आणि आदर असला पाहिजे असे मत यावेळी त्यांनी व्यक्त केले.या कार्यक्रमाच्या निमित्ताने महाराष्ट्राचे महागायक कबीर नाईकनवरे यांनी संविधानाची प्रस्तावीका १६ भाषांमधून १५० गायक गायकांना घेवून ऐकाच मंचावर गायलेने वर्ल्ड बुक ॲाफ रेकॉर्ड लंडन यांच्याकडून ना.रामदासजी आठवले साहेब यांच्या हस्ते दुबई येथे एक्सलंन्स ॲवॅार्ड मिळाले बद्दल विशेष सन्मान यावेळी हौसाई बंडू आठवले चॅरिटेबल ट्रस्ट कोल्हापूर यांच्या वतिने मा.कबीर नाईकनवरे यांचा करण्यात आला.तसेच लोकशाही चा चौथा स्तंभ असलेल्या परिसरात आण्याया विरूध्द वाचा फोडणार्या पत्रकार बांधवांना हौसाई बंडू आठवले चॅरिटेबल ट्रस्ट कोल्हापूर यांच्या वतिने शाल ट्रॅाफी आणी झाड असे देवून मा.बाबासाहेब नेर्ले,प्रतिनिधी लोकमत संतोष माने प्रतिनिधी तरूण भारत,डॅा.प्रा.प्रवीण जाधव प्रतिनिधी सकाळ,प्रमोद ठेकळे प्रतिनिधी सकाळ,अनिल निगडे,प्रतिनिधी सिंन्दूसमाचार,मा.विशाल फुले प्रतिनिधी पुण्यनगरी,उदय साळोखे यांचा सन्मान यावेळी होसाई बंडू आठवले चॅरिटेबल ट्रस्ट कोल्हापूर यांच्यावतिने उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.या कार्यक्रमासाठी ग्रा.प.उचगांव चे माजी सदस्य मा.दतात्रय तोरस्कर,सामाजिक कार्यकर्ते नामदेव वाईंगडे,उचगांव माजी सरपंच अनिल शिंदे,माजी तंटामुक्त अध्यक्ष उमेश पाटील,सामाजिक कार्यकर्ते मा.उमेश देशमुख,माजी सदस्य ॲड.सचिन देशमुख,माजी सदस्य सचिन गाताडे,माजी सदस्य वैशाली कांबळे,विद्यमान सदस्य वैजयंती यादव,विद्यमान सदस्य श्रीधर कदम,विद्यमान सदस्य तलाह मनेर,धनाजी कांबळे,संजना बनसोडे,रुपेश परिट हे या कार्यक्रमास सन्मानीय उपस्थिती होती यावेळी उपस्थित मान्यवरांना झाड देवून सत्कार ट्रस्ट च्या वतिने करण्यात आला या कार्यक्रमासाठी भीम अनुयायी प्रचंड संख्येने उपस्थित होते.या कार्यक्रमाचे आभार सामाजिक कार्यकर्ता अर्चना माळगे यांनी मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button