Uncategorized
उजळाईवाडी येथील महामार्ग पोलीस घटक केंद्रात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती साजरी!

उजळाईवाडीत महामानवाला अभिवादन!
उजळाईवाडी (सलीम शेख ) : उजळाईवाडी येथील महामार्ग पोलीस महाराष्ट्र राज्य, मुंबई घटक केंद्रात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
याप्रसंगी पोलीस उपनिरीक्षक प्रदीप जाधव यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर आधारित महत्त्वपूर्ण माहिती उपस्थितांना दिली. रवी गायकवाड यांनी आपल्या मनोगतातून डॉ. आंबेडकरांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकला. आनंद माने यांनी उपस्थितांना जयंतीच्या शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाच्या शेवटी अनंत कोंढरे यांनी आभार प्रदर्शन केले.
या कार्यक्रमात पोलीस उपनिरीक्षक प्रदीप जाधव, रवी गायकवाड, पोलीस अंमलदार अनंत कोंढरे, आकाश पाटील, अमर अडुळकर, आनंद माने, चेतन बोंगाळे यांच्यासह अनेक पोलीस कर्मचारी उपस्थित होते.